Fitness Tips
Fitness Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fitness Tips: चाळीशीनंतरही राहा 'यंग आणि फिट', फॉलो करा 'या' गोष्टी

दैनिक गोमन्तक डिजिटल

आरोग्याच्या बाबतीत आपण करत असलेल्या चुकांचा विचार सुरू केला तर एका मागोमाग एक असंख्य चुका दिसू लागतील. अर्थात त्यातली सगळ्यात मोठी म्हणजे आपण करत असलेली खाण्याबाबतची हेळसांड. अर्थात त्यामुळे उद्भवणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, सांधेदुखी अशा रोगांची लांबलचक यादी डोळ्यासमोरं येईल. आपण ठरवलं तर या सगळ्या गोष्टीवर आपण सहज ताबा मिळवू शकतो.

थोडीशी काळजी, जरा स्वतःवर नियंत्रण मिळवलं की आजार आपल्यापासून कोसो दूर राहू शकतो. आपण फक्त म्हणतो आहोत की उपचार महाग होत आहेत, औषधांचा खर्च वाढतोय याबद्दल ओरडा करत असताना पूर्णतः मोफत असलेल्या बाबींकडे आपले लक्षच जात नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा अवलंब केल्यास आपण ताणतणाव - आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो.

बेडवरून लवकर उठा- 'लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य धनसंपदा भेटे' अशी म्हण आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. जेवढे आपण लवकर अंथरुणातून जागे होऊन उठू तितकी आपली पचन क्रिया, आरोग्य यावर चांगला परिणाम होतो. प्रातःकाळची हवा आरोग्याला मानवणारी, स्वच्छ, शांत असते. यावेळेत वाचन, मनन, चिंतन केल्यास बुद्धी तीक्ष्ण होते, मनात सकारात्मकता येते हे प्रयोगावरून सिद्ध झालंय .

सकस आणि सात्विक आहार- घरी तयार केलेले अन्न हेच खरे शरीरासाठी उपयुक्त असते. भलेही ती भाजी-भाकरी का असेना ती घरी तयार केलेली असेल तर ती आरोग्यासाठी उपयुक्त असते. जंक फूड आणि हॉटेलिंग करणे हे आरोग्यासाठी हळूहळू हानिकारक बनतेच. खाण्यातल्या शिस्तीची सुरुवात लहानपणापासून केली पाहिजे कारण एकदा जिभेला सवय लागली की ती बदलणं खूप अवघड जातं.

कामाचे नियोजन - आपली कार्यक्षमता प्रत्येकाला माहित असते. त्यामुळं आपल्याला जेवढं झेपेल, जेवढं जमेल तेवढंच काम करावं. अतिरिक्त कामाच्या भारामुळे ताण येतो, चिडचिड होते, अकारण राग येतो आणि या गोष्टी आपलं मानसिक आरोग्य बिघडवतात. त्यामुळे कामाचे नियोजन योग्यरितीने करणे केव्हाही उपयुक्त ठरते.

छंद जोपासणे- असं म्हणतात कि माणसाच्या अंगी रोजीरोटी कमावण्याबरोबरच एखादी कला देखील असावी. तुमचे छंद, कला हि तुम्हाला तुमच्या रुटीन लाईफ मधून थोडंफार हलकं करतात. आलेला ताण, नैराश्य घालवण्यास मदत करतात. छंद, कला या माणसाला मानसिकदृष्ट्या तरुण ठेवतात, फ्रेश ठेवतात.

व्यसनाधीन न होणे- आजकाल शाळा-कॉलेजमधली मुलं देखील दारू, सिगारेट सारख्या व्यसनाच्या आहारी गेल्याच आपल्याला दिसतं . ज्या वयात ज्ञान मिळवून आपलं करिअर, उज्ज्वल भवितव्य याबाबत आखणी करायची असते त्या वयात व्यसनांच्या आहारी गेलेली मुलं बघितली कि आपण नक्की प्रगतीपथावर चाल्लोय का? असा प्रश्न पडतो. मुलं कमी वयात वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडत आहेत. म्हणून प्रसंगी मनोविकार तज्ञांची मदत घ्यायला मागेपुढे बघता नाही. आताशा मानसिक आजारांची विशेषतः डिप्रेशनची संख्या खूप वाढतेय. मानसिक आजारांची लक्षणे वेळेवर ओळखून त्यावर त्वरित उपचार घेण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

Santhacruz Health Centre : सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे

SCROLL FOR NEXT