Sore Throat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reasons For Sore Throat: सर्दी किंवा तापच नाही तर 'या' गंभीर आजारांमुळे देखील घसा खवखवतो

Reasons For Sore Throat: सर्दी आणि फ्लू हे घसा खवखवण्याचे कारण असू शकते. पण घसा दुखल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Puja Bonkile

Reasons For Sore Throat: बदलत्या हवामानामुळे हिवाळ्यात घसादुखीची समस्या सुरू होते. घसा खवखवल्यामुळे आवाजात बदल होऊन घशात खवखव होते आणि वेदना होतात. घसा खवखवण्यामागे सर्दी आणि ताप हे कारण असू शकते.

पण घशात जळजळ होण्याची समस्या हलक्यात घेऊ नका. त्यामुळे अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. घसा खवखवणे, खोकला,अन्न गिळताना त्रास होणे यासारख्या समस्या जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

घसादुखीची कारणे

  • ताप आणि इन्फेक्शन

हिवाळ्यात फ्लू आणि इन्फेक्शनमुळे घसा खवखवतो. जर घसा दुखणे लवकर बरे झाले नाही आणि समस्या वाढली तर हे बॅक्टेरियाचे संक्रमण असू शकते. त्यामुळे किडनीवर सूज येण्याचा धोका वाढतो. अशावेळी घसादुखीकडे दुर्लक्ष न करात त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • अॅलर्जी

घसा खवखवणे आणि दुखणे लवकर बरे झाले नाही तर घशात गंभीर अॅलर्जी होऊ शकते. अनेक वेळा धूळ, माती किंवा कोणत्याही पदार्थ खाल्याने अॅलर्जी होऊन घसा दुखतो.

  • कर्करोग

घसा दुखणे देखील कर्करोगाचे कारण असु शकते. कर्करोगामुळे घसा खवखवणे टॉन्सिलपासून सुरू होते. यामुळेच घसादुखीकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. अशावेळी या गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी, घसा दुखत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

  • पोटाच्या समस्या

पोटाच्या गंभीर समस्येतून बाहेर आल्यानंतरही घसा दुखण्याची समस्या उद्भवू शकते. अॅसिड रिपल्क्समुळे पोटातील अॅसिडमुळे घसा खवखवतो. यामुळे घशातही वेदना होतात. हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींपासून सुरुवात करून तुमची संपूर्ण लाइफस्टाइल बदलण्याची गरज आहे.

  • कोरोना

कोरोनाच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे घसा खवखवणे. जर दीर्घकाळ घशात दुखत असेल तर ते कोरानाचे लक्षण असू शकते. अशावेळी घसा खवखवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्यथा काही गंभीर आजार होऊ शकतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT