Dangerous Islands In The World Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dangerous Islands In The World: 'ही' आहेत जगातील सर्वात धोकादायक बेटं

Puja Bonkile

Dangerous Islands In The World: अनेक लोक सुट्टी घालवण्यासाठी किंवा निसर्गाच्या अद्भुत दृश्यांचा आनंद घेण्यासाठी जातात. काही लोक डोंगरावर जातात, काही समुद्राच्या किनाऱ्यावर जातात किंवा एखाद्या बेटावर जातात. 

काही बेट इतके सुंदर आहे की त्याचे सौंदर्य आपल्याला भुरळ घालतात. पण आज असाच काही बेटांबद्दल जाणून घेऊया जे सर्वात धोकादायक आहेत.

  • सबा बेट

"सबा" हे एक बेट आहे जे नेदरलँडमध्ये वसलेले आहे. या छोट्या बेटाचे क्षेत्रफळ केवळ 13 चौरस किलोमीटर आहे आणि ते खूप आकर्षक आहे, परंतु येथे अनेक धोकादायक वादळे आहेत. या वादळांमुळे या बेटाच्या आसपास अनेक जहाजे तुटून बुडाली आहेत. सध्या या बेटावर सुमारे 2000 लोक राहतात.

  • मगरांचे बेट

दुसरे बेट म्हणजे "मगरांचे बेट" जे म्यानमारमध्ये आहे. त्याला "क्रोकोडाइल आयलंड" असेही म्हणतात. येथे अनेक धोकादायक मगरींनी भरलेले तलाव आहेत. या बेटाचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले गेले आहे.

कारण येथे राहणाऱ्या मगरींनी सर्वाधिक लोकांना त्रास दिला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी या बेटावर सुमारे 1000 जपानी सैनिक राहत होते, मात्र येथील धोकादायक मगरीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेतला आहे. फक्त 20 सैनिक राहिले, उर्वरित 980 सैनिक मगरींनी जाव घेतला होता. काही शास्त्रज्ञ आणि इतिहासकार ही घटना सत्य मानत नाहीत.

  • आयसोल ला गैओला

"आयसोल ला गैओला" हे आणखी एक धोकादायक बेट आहे. जे इटलीमध्ये आहे. हे छोटे बेट नेपल्सच्या आखातात आहे आणि त्याची एक भयानक कथा आहे. असे म्हटले जाते की जो कोणी ते विकत घेतो तो मरण पावतो किंवा त्याच्या आणि त्याच्या कुटुंबास काही अप्रिय घटना घडतात. हे बेट विकत घेतलेले अनेक लोक मरण पावले आहेत. आता हे बेट सरकारी नियंत्रणाखाली आहे, लोक येथे भेट द्यायला येतात, पण रात्र होण्यापूर्वी परत जातात.

  • लुझोन बेट

फिलिपाइन्सचे "लुझोन बेट" "ज्वालामुखी बेट" म्हणून प्रसिद्ध आहे. कारण तेथे एक धोकादायक आणि सक्रिय ज्वालामुखी आहे. ज्याला "ताल ज्वालामुखी" म्हणतात. या ज्वालामुखीच्या विवरात एक सरोवर आहे. त्याला ‘ताल सरोवर’ म्हणतात. हे बेट पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. या ठिकाणी जाणे धोकादायक आहे. कारण ज्वालामुखीचा उद्रेक कधी होऊ शकतो हे कोणालाही माहिती नाही. नुकतीच अशी घटना घडली, त्यानंतर आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT