Beauty Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: 'हे' 5 पदार्थ आहेत व्हिटॅमिन ई कॅप्सूलसाठी सर्वोत्तम पर्याय

व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेण्याएवजी तुम्ही व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता.

Puja Bonkile

व्हिटॅमिन ई घटकामुळे आरोग्यच नाही तर त्वचा देखील फायदेशीर असते. या व्हिटॅमिनमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील हे व्हिटॅमिन फायदेशीर ठरते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मानले गेले आहे. जे आपल्या त्वचेच्या पेशी निरोगी ठेवते आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते.

जे आपली त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते. आजकाल अनेक महिला चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल थेट त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारे लावू लागले आहेत. पण काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता भासणार नाही आणि त्वचा तरूण राहील.

जेव्हा कोणतेही पदार्थ खातो तेव्हा त्यातील पोषक घटक शरीराला आतून पोषण देतात. ज्यामुळे आपण आतून निरोगी राहतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या गोष्टी खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला फायदे होतील, यासोबतच तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होईल. चला तर मग जाणून घेऊया आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा

  • बदाम

बदामांमध्ये व्हिटॅमिन ई देखील मोठ्या प्रमाणात असते. निरोगी त्वचेसाठी बदाम खाणे फायदेशीर असते. बदाम हा उष्ण पदार्थ आहे. यामुळे बदामचे अतिसेवन टाळावे. बदाम रात्री पाम्यात भिजवू खाल्यास अधिक फायदा होतो.

  • बीट

बीट केवळ त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर त्याची पाने व्हिटॅमिन ईसह पोषक तत्वांचे भांडार देखील आहेत. बीटची पाने हिरव्या भाज्यांप्रमाणे खाऊ शकतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.

  • पालक

लोहाबरोबरच पालकामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात. त्यातील एक व्हिटॅमिन ई आहे. आहारात पालकाचा समावेश केल्यास खूप फायदा होईल.

  • सूर्यफूलाच्या बिया

आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश केल्यास शरीरातील व्हिटॅमिन ई ची कमतरता पूर्ण होऊ शकते. सुमारे 100 ग्रॅम सूर्यफुलाच्या बियांमध्ये 35.17 मिलीग्राम व्हिटॅमिन ई असते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी सूर्यफुलाच्या बिया खूप फायदेशीर ठरतील.

  • अॅव्होकॅडो

व्हिटॅमिन ई साठी आहारात अॅव्होकॅडोचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे लहान वयात तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडण्याची भीती नसते आणि तुमचा चेहरा तरुण दिसतो. एवोकॅडोचा वापर अनेक महागड्या सौंदर्य उत्पादनांमध्येही केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT