Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी वापरा हे घरघुती फेसमास्क

जर तुम्हाला त्वचेला हायड्रेट ठेवायचे असेल तर पुढील गोष्टींचा वापर करून मास्क तयार करू शकता.

Puja Bonkile

Skin Care Tips: प्रत्येक महिलेला चेहरा सुंदर दिसावा असे वाटते. अनेक महागडे प्रोडक्ट आणि ट्रिटमेंट घेऊन देखील पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. यामुले तुम्ही काही घरघुती उपाय करून चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणि त्वचा हायड्रेट ठेऊ शकता.

Cucumber

कोकडी आणि टोमॅटो मास्क

हा मास्क केवळ त्वचेची हायड्रेट ठेवत नाही तर त्वचेवरील टॅनिंग देखील काढून टाकतो आणि चेहऱ्यावर चमक आणतो.

लागणारे साहित्य

1/2 काकडी

2 चमचे कोरफड जेल

1 टोमॅटो

मास्क बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले काकडी आणि टोमॅटो चांगले मिक्स करावे.

नंतर त्यात कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावावे.

चेहऱ्यावर 15-20 मिनिटे कोरडे होऊ द्यावे.

नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे.

Papaya

पपई आणि बदाम तेल

हा मास्क त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर असतो. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही हा मास्क लावू शकता.

लागणारे साहित्य

1/4 पिकलेली पपई

1 टीस्पून बदाम तेल

मास्क बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले पपई चांगली मॅश करावी आणि नंतर त्यात बदामाचे तेल मिक्स करावे.

नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे आणि 15-20 मिनिटे राहू द्यावे.

नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

एवोकॅडो आणि काकडीचा मास्क

एवोकॅडो आरोग्यासग त्वचेसाठी देखील खूप चांगला आहे. काकडी, एवोकॅडो आणि लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही मास्क तयार करू शकता.

लागणारे साहित्य

अर्धी वाटी काकडी

अर्धा एवोकॅडो

अर्ध्या लिंबाचा रस

मास्क बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले एवोकॅडो आणि काकडी चांगली मॅश करावी.

नंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करावा.

नंतर त्वचा स्वच्छ करून आणि हा मास्क लावावा.

सुमारे 10-15 मिनिटे असेच राहू द्यावे.

नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT