Use these things for Glow like an actress dainik gomantak
लाइफस्टाइल

चेहऱ्यावर येईल अभिनेत्रींसारखा ग्लो; किचनमधीन या गोष्टींचा करा वापर

Skin Care Tips : तुमच्या किचनमध्ये असलेले वेगवेगळे मसाले तुमचे आरोग्य राखण्यासाठी तसेच तुमची त्वचा सुधारण्याचे काम करतात.

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips : भारतीय स्वयंपाकघराचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ तुमच्या चवीचीच नाही तर तुमच्या सौंदर्याचीही चांगली काळजी घेते. तुमच्या किचनमध्ये असलेले वेगवेगळे मसाले तुमचे आरोग्य राखण्यासाठी तसेच तुमची त्वचा सुधारण्याचे काम करतात. चला जाणून घेऊया, किचनमध्ये कोणत्या मसाल्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सेलिब्रिटी ग्लो आणू शकता. (Use these things for Glow like an actress)

सुरकुत्या दूर करणारे जिरे :

जिऱ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, एन्झाईम्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला निरोगी ठेवतात. त्याचे वृद्धत्व विरोधी गुणधर्म अकाली सुरकुत्या रोखून त्वचा सुंदर आणि चमकदार बनवतात.

टॅनिंग घालवण्यासाठी दालचिनी :

यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरीरातील रक्तप्रवाह बरोबर ठेवतात. आणि ते शुद्ध करतात. ज्यामुळे तुमचे सौंदर्य वाढते. टॅनिंग दूर करण्यासाठी दालचिनी देखील एक चांगला उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी एक लहान केळी, 2 चमचे दही, 1 चमचे दालचिनी पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करून चांगले मिसळा. या पॅकचा पातळ थर चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांसाठी तसाच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा.

मुरुमांपासून सुटकेसाठी काळी मिरी :

काळी मिरी त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्याची पावडर बनवून तुम्ही ते तुमच्या फेस पॅकमध्ये मिक्स करून स्क्रब म्हणून वापरू शकता आणि चेहऱ्यावरील घाण साफ करू शकता. हे करण्यासाठी एक चमचा मध आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर मिसळून फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास कोरडे राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.

चमकदार त्वचेसाठी हळद

हळदीमध्ये असलेले अँटिसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुरुम आणि सुरकुत्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. यासाठी एक ग्लास दुधात हळद मिसळून प्यायल्याने रक्त शुद्ध होते, ज्यामुळे त्वचेवर चमक येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT