Sugar Scrub For Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sugar Scrub For Skin: चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी वापरा साखरेचे 'हे' 4 स्क्रब

Sugar Scrub For Skin: तुम्ही चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी साखरेपासून स्क्रब बनवू शकता.

Puja Bonkile

skin care tips sugar how to make sugar scrub for glowing skin

आजकालच्या धावपळीच्या जीवनात त्वचेकडे लक्ष देणं होत नाही. यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. बदलत्या ऋतूमध्ये त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे असते.

बदलत्या ऋतूमध्ये त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अनेक लोक आपला चेहरा चमकदार दिसण्यासाठी विविध प्रकारचे महागडे प्रोडक्ट वापरतात. परंतु काहीवेळा त्याचा परिणाम फार काळ दिसून येत नाही. या प्रोडक्टमध्ये असलेले घटक काहीवेळा त्वचेला फायदे देण्याऐवजी नुकसान करतात.

यामुळे तुम्हाला साखरेपासून काही खास प्रकारचे स्क्रब घरच्या घरी कसे बनवायचे हे जाणून घेऊया. जास्त पैसे खर्च न करता तुमची त्वचाही घरच्या घरी चमकू शकेल.

लिंबू आणि साखर

लिंबू त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे टॅनिंगची समस्या कमी होते. हे स्क्रब बनवण्यासाठा एका भांड्यात साखर टाकून त्यात लिंबाचा रस मिक्स करावा. त्यात थोडे मध टाकावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि स्वच्छ पाण्याने धुवावे.

टोमॅटो आणि साखर

टोमॅटो आणि साखर मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर चमक वाढवू शकता. यासाठी अर्धे टोमॅटो घ्या, त्यावर साखर टाका आणि चेहऱ्यावर मसाज करा.नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

ग्रीन टी आणि साखर

ग्रीन टीमध्ये अनेक प्रकारचे घटक आढळतात. जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्याही दूर होते. हे करण्यासाठी एका छोट्या भांड्यात ग्रीन टी घ्या, त्यात एक चमचा साखर घाला. आता या पेस्टने चेहऱ्याला मसाज करा आणि ५ ते १० मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवा.

हळद आणि साखर

हळद त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हे स्क्रब तयार करण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात एक चमचा हळद घ्या आणि त्यात एक चमचा मध आणि साखर मिक्स करा.नंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा.

केळी आणि साखर

चेहऱ्यावरची चमक वाढवण्यासाठी तुम्ही केळी आणि साखर मिक्स करून लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. यासाठी पिकलेली केळी आणि साखर मिक्स करावी. हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT