Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: तुम्हीही डायरेक्ट नळाच्या पाण्याने चेहरा धुताय?त्वचा होऊ शकते खराब

नळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेसह केस देखील खराब होउ शकतात

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips: प्रत्येकासाठी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच जगण्यासाठी खाणे देखील महत्त्वाचे आहे. चेहरा धुण्यापासून ते आंघोळीपर्यंत आपण अनेक प्रकारच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो.

नळाच्या पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी धोकादायक ठरु शकते. हे वाचुन तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण नळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने तुमची त्वचा खराब होऊ शकते.

त्वचा तज्ज्ञ सांगतात की, चेहरा धुण्यासाठीही चांगले आणि स्वच्छ पाणी वापरावे. अनेक लोक आपला चेहरा धुण्यासाठी थेट नळाचे पाणी वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की कडक नळाच्या पाण्यात असलेल्या खनिजांमुळे तुमच्या त्वचेची छिद्रे अडकून तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, ज्यामुळे मुरुमाची समस्या निर्माण होउ शकते.

  • फिल्टर न केलेले पाणी त्वचेसाठी चांगले नाही 

नळातून येणारे थेट पाणी तुम्ही भांडी साफ करण्यासाठी आणि दैनंदिन घरातील कामासाठी वापरू शकता. या पाण्यात लोह, मॅग्नेशियम, झिंक, तांबे आणि कॅल्शियमसारखे घटक असतात.

हे घटक शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. कडक पाण्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पण तरीही हे पाणी (Water) त्वचेसाठी चांगले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कारण ते त्वचेतून नैसर्गिक तेल कमी करुन त्वचा कोरडे करू शकते.

skin and Hair
  • केस देखील खराब होतात

डॉक्टरांचे म्हणणे आहे की जेव्हा हे पाणी क्लिंजर किंवा साबणामध्ये मिसळले जाते तेव्हा ते त्वचेचे छिद्र बंद करते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी, नळाचे पाणी सर्वात धोकादायक आहे. 

फिल्टर न केलेले पाणी त्वचेच्या मायक्रोबायोटाचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे एक्जिमा, मुरुम आणि त्वचारोग वाढू शकतो. फिल्टर न केलेले पाणी केसांचे आरोग्य खराब करू शकते. यामुळेच चेहरा आणि केस धुण्यासाठी नेहमी फिल्टर केलेले पाणी वापरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT