Swasthyam 2022 | Global Swasthyam | Mental health Event Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Swasthyam 2022: एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्याच्या सोप्या टिप्स... जाणून घ्या एका क्लिकवर

मानसोपचार तज्ञांच्या मते अनेक वेळा यासाठी आजूबाजूचे सदोष वातावरणही कारणीभूत असते...

गोमन्तक डिजिटल टीम

Swasthyam Event 2022: एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच एकाग्रता आणि स्मरणशक्तीला स्वामी विवेकानंद यशाची गुरुकिल्ली असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे, आपण निश्चित केलेले लक्ष किंवा साध्य होण्यासाठी झोकून देणे, हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे.

मेंदूने साठवून ठेवलेले हवे ते, हवे तेव्हा, हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. योग्य वेळी योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणे आणि लक्षात राहाव्यात त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नाने ते नक्कीच शक्य असते. परीक्षेतील यश असो किंवा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्याने साध्य करता येतात.

कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो. अनेकांना परीक्षेत मनासारखे यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असते पण डोक्यात शिरत नाही असे वेगवेगळी कारणे असतात.  यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती या क्षमता वृद्धिंग करण्यासाठी प्रयत्न करणे.

• योगाभ्यास आणि ध्यानधारणा- एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो. आपल्याला हवे ते यश मिळाले आहे, ध्येय साध्य केले आहे याची दृश्य कल्पना करा, परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचे आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करते. वेळ, पैसे खर्च न करता हे अनेक गोष्टींचा सराव करता येईल. (Swasthyam Wellness)

• गोष्टी आठवण्याचा सराव- काही गोष्टी आठवण्याचा सराव करा. उदाहरणार्थ शाळा ते घर या मार्गातील रस्ते, त्यावरच्या दुकानांच्या पाट्या,  इमारतीचे आकार, विक्रेत्यांचे स्टॉल्स, त्यावरचे सामान, विक्रेत्यांचे आवाज, धावणारी वाहने, वाचलेले पुस्तक, खेळलेला खेळ, ऐकलेली भाषण, पाहिलेले नाटक- चित्रपट, एखादे दृश्य, सहलीच्या वेळी वा सुट्टीत गावी अनुभवलेल्या गोष्टी अशी आठवता येण्याजोग्या गोष्टींची यादी बरेच लांब लांबवता येईल.

• आपले लक्ष एकाग्र का होत नाही-

लक्षात का राहत नाही याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करताना वारंवार लक्ष विचलित होते, वेळेवर काम पूर्ण होत नाही किंवा मेंदू एका जागेवर स्थिर राहत नाही, वरीलपैकी सर्वच समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर तुमच्यात एकाग्र होण्याची क्षमता नाही असा त्याचा अर्थ आहे. मानसोपचार तज्ञांच्या मते अनेक वेळा यासाठी आजूबाजूचे सदोष वातावरणही कारणीभूत असते. तथापि या समस्येवर नियंत्रण मिळवणे काहीच कठीण नाही. कोणतेही महत्त्वाचे काम करताना किंवा अभ्यास करताना एकाग्रता भंग करणाऱ्या घटना, एकाग्रता भंग करणाऱ्या घटकांपासून नेहमीच दूर राहावे.

• कामाचे प्राधान्य ठरवणे- प्रत्येक कामाचे प्राधान्य ठरवून घ्यावे. अभ्यास किंवा कोणतेही एक महत्त्वाचे काम करण्यासाठी सकाळची वेळ सर्वांत चांगले असते. तसेच सकाळच्या वेळी मेंदूची कार्यक्षमता अधिक चांगले असते. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करणे चांगला पर्याय आहे. यामुळे व्यक्ती लक्षपूर्वक नवीन नवीन माहिती ग्रहण करण्यात सक्षम होते. तसेच यामुळे स्मरणशक्ती चांगले राहते.

• पुरेशी झोप घेणे- मेंदूची कार्यक्षमता मजबूत करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भरपूर झोपावे. विचारांवर योग्य नियंत्रण नसल्यास देखील वारंवार लक्ष विचलित होते. मानसिकदृष्ट्या निराश असणे किंवा वैचारिक गोंधळ होत असल्यामुळे हे असे होते.  पुरेशी झोप न येणं हे भविष्यातील नैराश्याचं प्रारंभिक लक्षण असू शकतं. प्रत्येकाला लागणारी पुरेशी झोप वेगवेगळी असू शकते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT