Wrist Pain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

5 Wrist Pain Exercise: मनगटदुखीचा त्रास असेल तर करा 'हे' 5 सोपे व्यायाम

Wrist Pain Exercises at Home: जर तुम्हालाही अचानक तुमच्या मनगटात दुखू लागले असेल तर काही सोपे व्यायम करून तुम्ही या त्रासापासून सुटका मिळवू शकता.

Puja Bonkile

Simple Exercises For Wrist Pain

जास्त वजन उचलणे, हाताच्या साहाय्याने केलेले व्यायाम आणि लॅपटॉप-मोबाईलचा सतत वापर यामुळे मनगटात दुखणे सामान्य आहे. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही हलके स्ट्रेचिंग करू शकता. 

तुम्ही पुढील काही सोपे व्यायाम जागेवर बसून करू शकता आणि या वेदनापासून सुटका मिळवू शकता. हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. हे व्यायाम कसे करावे हे जाणून घेऊया.

1) हा व्यायम करण्यासाठी दोन्ही हात समोरच्या दिशेने आणा आणि मुठी बनवून ती उघडा. असे करताना हळूहळू करावे आणि मुठी बनवताना बोटांचा चांगला वापर करावा लागतो. आपली मुठ घट्ट पकडल्यानंतर थोडा वेळ थांबा आणि नंतर ती उघडा. असे किमान 6 ते 8 वेळा करावे लागेल.

2) मनगटदुखी कमी करण्यासाठी दोन्ही हात समोरच्या दिशेने आणा आणि मनगट सर्वात पहिले घड्याळाच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या विरूद्ध दिशेने फिरवा. यामुळे मनगटाच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

3) हा व्यायाम करताना दोन्ही तळवे जोडा. म्हणजे नमस्काराच्या मुद्रेत यावे. यानंतर, तळवे वेगाने दाबा. नंतर तळवे वळवा आणि त्यांना खाली हलवा. यामुळे मनगटांसह बायसेप्स ताणले जातात. 

4) तुम्हाला मनगटदुखीपासून लवकर आराम हवा असेल तर उजवा हात समोरच्या दिशेने न्यावे. डाव्या हाताने उजव्या हाताची बोटे आपल्या दिशेने खेचा. नंतर तळवे खाली करून असे पुन्हा करावे. हे एका हाताने वर आणि खाली स्ट्रेचिंग केल्यानंतर दुसऱ्या हाताने पुन्हा करा. हे दोन्ही हातांनी किमान 4 ते 5 वेळा करावे.

5) या व्यायामामध्ये स्ट्रेस बॉल हातात घ्या आणि तो वेगाने दाबा. यामुळे मनगट मजबूत होतात आणि हाताची ताकदही वाढते. हे दोन्ही हातांनी किमान 3 ते 5 वेळा करा.

टिप: तुम्हाला वरील व्यायाम करून देखील आराम मिळत नसेल तर ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

Cable Theft Shigao: शिगावमध्ये वीज खात्याच्या केबल चोरीचा प्रयत्न; तिघांना अटक

Ro-Ro Service: मुंबईहून 4 तासांत मालवण, तर 3 तासांत रत्नागिरी! लवकरच सुरु रो-रो सेवा, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT