Anger Management Technique Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Anger Control: 'आता माझी सटकली'... तुमचंही असंच होतंय का? हे उपाय करून पाहा

Anger Management Techniques: सतत राग राग केल्याने याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो.

Akshata Chhatre

Anger Management Tips

तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येतो का? आजूबाजूच्या लोकांमुळे सतत चिडचिड होते का? कधीतरी हातातली वस्तू फेकून मारावी एवढा राग येतो का? तुमचं उत्तर हो असं असेल तर हे बरोबर नाही. राग येणं ही बाब अत्यंत नॉर्मल असली तरीही यामुळे आजूबाजूची माणसं दुखावली जाऊ शकतात.

आपण या समाजात वावरतो, त्यामुळे प्रत्येकासोबत खेळीमेळीने वागणं आपल्यासाठी भाग आहे. लक्षात घ्या सतत राग राग केल्याने याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. मग रागावर नेमका कसा ताबा मिळवावा हे आता जाणून घेऊया..

दीर्घ श्वास घ्या:

आपल्याला भरपूर राग येतोय असं वाटतं ते एक दीर्घ मोठा श्वास घ्या. यामुळे मनावर आलेला ताण कमी होतो आणि राग आपोआप कामी व्हायला मदत मिळते.

वेळ मिळेल तसा किमान श्वासाचा व्यायाम करा, यामुळे आपला स्वतःवर ताबा राहतो.

गाणी ऐका:

चांगली गाणी ऐकल्यामुळे मन विचलित व्हायला मदत होते, यामुळे नकारात्मक विचार बाजूला सारायला मदत मिळते आणि राग कमी होतो.

फेरफटका टाकून या:

भरपूर राग आलेला असेल तर ती जागा सोडून किठेतरी जाऊन या. काहीवेळ एकांतात घालवल्याने तुम्ही नेमकं काय चुकलं यावर स्वतः विचार कराल. डोकं शांत असताना विचार केल्यास चुकीचे विचार मनात येणार नाही, निर्णय चुकणार नाही किंवा माणसं दुखावली जाणार नाहीत.

यू-विल-बी ओके:

तुम्हाला जर का अजिबातच रागावर ताबा मिळवता येत नसले तर काहीवेळ शांत बसा आणि स्वतःला समजावा की सगळं काही नीट होणार आहे, मी नीट आहे, खुश आहे. माझा राग मी कमी कारेन, मी स्वतःवर ताबा मिळावेन अशी वाक्यं सतत बोलल्याने तुम्हाला खात्री पटेल की तुम्ही हे करू शकता आणि राग आटोक्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT