Anger Management Tips: 'हे 6 पदार्थ मिळवून देतील रागावर नियंत्रण

तुम्हालाही राग येत असेल तर हे पदार्थ खाऊ नका.
Anger Management Tips
Anger Management Tipsअोगलगक उदसोलूोक
Published on
Updated on

Anger Management Tips: 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू!'ही म्हण तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल. जास्त राग येणे, प्रत्येक गोष्टीवर राग येणे याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

यासोबतच कधी-कधी ही सवय तुमच्या आर्थिक नुकसानाचे कारणही बनू शकते. राग येणे हा मानवी स्वभावाचा एक सामान्य भाग आहे.

परंतु जर राग तुमच्यावर नियंत्रण ठेवू लागला तर ते तुमच्यासाठी चिंताजनक लक्षण असू शकते. यामुळेच राग आल्यावर काही पदार्थांचे सेवन टाळणे फायद्याचे ठरू शकते.  

  • कॉफी

अनेक लोकांना कॉफी प्यायला आवडते. असे म्हणतात की कॉफी पिल्याने थकवा दुर होतो आणि उत्साही वाटते. जेव्हा ऊर्जा जास्त असते तेव्हा ते मनाला चालना देते आणि आक्रमकता वाढवते. त्यामुळे कॉफीचे अतिसेवन टाळावे.

  • गोड पदार्थ

गोड पदार्थ खाल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने खाली वर होते. राग आल्यावर कँडी, चॉकलेट खाणे टाळावे. तसेच जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरते. वजन वाढणे, मधुमेह यासारख्या समस्या उद्भउ शकतात.

Anger Management Tips
Monsoon Special Tea: रिमझिम पावसाची मजा द्विगुणित करण्यासाठी घरी बनवा 'हा' स्पेशल चहा
  • मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ खाल्याने चिडचिड किंवा राग वाढू शकतो. मसालेदार पदार्थ शरीराला उष्णता देते. तुमच्या शरीरात आधीपासून उष्णता असल्यास, तुम्हाला आणखी घेण्याची गरज नाही. शरीराला अधिक उष्णता दिल्याने पित्त दोष वाढेल, जो राग वाढवण्याचे काम करतो.जे लोक मसालेदार आणि तमसी पदार्थ खातात त्यांना गार जास्त येतो.

  • मद्यपान

मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक असते. मद्यपान करणाऱ्या लोकांना जास्त राग येतो. यामुळे राग आल्यावर मद्यपान करु नका.

  • प्रोसेस केलेले पदार्थ

प्रोसेस केलेले पदार्थ शरीरासाठी चांगले नसतात. प्रोसेस केलेले पदार्थ यकृतावर परिणाम करतात यामुळे साहजिकच तुमचा राग वाढतो. त्यामुळे जंक फूड, फास्ट फूड इत्यादींचे सेवन टाळावे.

  • राग आल्यावर या पदार्थांचे करावे सेवन

  • फळं

फळ खाणे आरेग्यदायी असते. तसेच फळ खाल्याने राग नियंत्रणात येतो. यामुळे जेव्हाही तुम्हाला राग येतो तेव्हा फल खावे.

  • दही

दही खाल्याने मुड चांगला होतो आणि राग देखील कमी होतो. यामुळे दह्याचे सेव करणे फायदेशीर ठरते.

  • पीनट बटर

पीनट बटरमध्ये राग शांत करण्याची क्षमता असते. कारण हा व्हेजिटेबल ऑइलपासून बनवलेले असते.

  • अक्रोड

अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले असते. तसेच राग शांत देखील करतो. यामध्ये फॅटी अॅसिड आणि ओमेगा ३ असते यामुले तणाव कमी होतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com