Silver Anklets Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Silver Anklets Benefits: 'या' गंभीर आजारांपासून दूर ठेवतात चांदीचे पैंजण

पायात चांदीचे पैजण घातल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि इतर अनेक गंभीर समस्या देखील दूर राहतात.

Puja Bonkile

Silver Anklets Benefits: पैंजण हे महिलांच्या सोळा श्रृंगारांपैकी एक मानली जाते. ते केवळ पायांचे सौंदर्यच वाढवत नाही तर विवाहित स्त्रीचे लक्षण देखील मानले जाते. यामुळेच प्रत्येक स्त्री पायात पैंजण घालते. जरी अनेक स्त्रिया स्टाईलसाठी ते घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का, पैंजण घातल्याने पायांचे सौंदर्य तर वाढतेच पण त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पायात चांदीची पैंजण घातल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि इतर अनेक गंभीर समस्या दूर राहतात. चला जाणून घेऊया चांदीची पैंजण घालण्याचे काय फायदे आहेत.

शरीराचे तापमान संतुलित राहते

चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. पायात पैंजण घातल्याने शरीर निरोगी राहते. पायात चांदीची पैंजण घातल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि त्यामुळे कमरेच्या खालच्या भागात चांदी घातली जाते. चांदी इतर धातूंच्या तुलनेत अत्यंत प्रतिक्रियाशील असते. जी पृथ्वीच्या ऊर्जेवर सहज प्रतिक्रिया देते, म्हणून बहुतेक स्त्रिया चांदीचे पैंजण घालतात.

हाडं मजबूत होतात

चांदीचे पैंजण घातल्याने हाडं मजबूत राहतात आणि पायांच्या संपर्कात आल्यावर या धातूचे घटक त्वचेला घासतात आणि शरीरात प्रवेश करतात. यामुळे हाडांना चांदीसारखी ताकद मिळते. घरातील कामांमुळे अनेकदा महिलांचे पाय सुजतात, अशा स्थितीत पैंजण घातल्याने सूज येण्यापासून आराम मिळतो.

पायाशी संबंधित समस्या दूर होतात

जर महिलांना पायांना मुंग्या येणे, सूज येणे किंवा दुखणे यासारख्या समस्या असतील तर चांदीचे पैंजण घालणे फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत

चांदीचे पैंजन घातल्याने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. चांदीचे पैंजन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरते आणि चांदीची पैंजन शरीरातील पायांमधून बाहेर पडणारी भौतिक विद्युत उर्जा बनवण्यास मदत करते. त्यामुळे शरीर निरोगी बनते.

रक्ताभिसरण सुधारते

चांदीचे पैंजण घातल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि म्हणूनच हिंदू धर्मात चांदीचे पैंजण घालण्याचा ट्रेंड आहे. जर तुम्हाला रक्ताभिसरणाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर चांदीची पैंजण घालावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT