Side Effects Of Earphone: Singing out loud is harmful to ear health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Side Effects Of Mobile Earphone: हेडफोन लावून मोठ्याने गाणी ऐकताय, मग ही बातमी वाचाच

इअर फोनमध्ये मोठ्या आवाजात गाणी एकल्यास कानाची श्रवण क्षमता 40 डेसिबलने कमी होऊन बहिरेपणा येण्याची शक्यता असते.

दैनिक गोमन्तक

आजकाल सर्व लोकांकडे (Earphone) इयरफोन असतात. अनेक लोकांना सतत इयरफोन कानात(Ear) लावून फिरण्याची सवय असते. इयरफोन वापरणे चुकीचे नाही, परंतु त्याचा तासंतास वापर करणे आरोग्यासाठी (Health) घातक ठरू शकते. गेल्या काही वर्षात इयरफोनच्या अतिवापरामुळे कान खराब होणे आणि रस्त्यावरील अपघातात वाढ झाली आहे. पण अलीकडच्या वर्षात ही एक गंभीर समस्या म्हणून उदयास आली आहे.

* इयरफोनचा अतिवापर हा तरुण पिढीमध्ये अधिक दिसून येते. यामुळे 50 तरुणांमध्ये कानाच्या समस्या निर्मान होत आहेत. इयर फोनच्या सतत वापरामुळे कान दुखणे, झोप न येणे, यासारख्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. आरोग्यतज्ञांच्या मते इयरफोनच्या अतिवापरामुळे आपली श्रवणशक्ती 40 डेसीबल पर्यंत कमी होते.

* तासंतास इयरफोनचा वापर केल्याने कानाचा पर्दा व्हायब्रेट होत असल्याने कान खराब होण्याची शक्यता असते. चक्कर येणे, कानात मुंग्या येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अनेक लोकांना दूरचे एकायला येणे कमी होते आणि यामुळे बहिरेपणा देखील येऊ शकतो.

तुमच्या आरोग्यावर इयरफोनचा विपरीत परिणाम होतो. इयरफोन आकाराने लहान असतात आणि यामुळे ते कानात सहज फिट बसतात, पण तरीसुद्धा बाहेरचा आवाज येणे बंद होत नाही. यामुळे अनेकजन बाहेरचा आवाज टाळण्यासाठी इयरफोनचा आवाज वाढवून गाणे एकतात. यामुळे कान लवकर खराब होऊ शकतात.

मोठ्याने संगीत एकल्याने मानसिक समस्या उद्भवू शकतात, तर हृदयरोग आणि कर्करोगाची शक्यताही वाढू शकते. इयरफोनमध्ये 100 डीबी पर्यंत आवाज येऊ शकतो. यामुळे तुमच्या कानाला हानी पोहोचु शकते. सामान्यत: कान 65 डेसीबल आवाज सहन करू शकतो. तर 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज कानांसाठी धोकादायक आहे. इयरफोनच्या अतिवापरामुळे कानाच्या नसा मृत होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT