Shravan Somvar: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shravan Somvar: तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण सोमवारी करावे 'हे' उपाय

सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित असतो. या दिवशी महादेवाची मनोभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात.

Puja Bonkile

Shravan Somvar: सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित असतो. या दिवशी महादेवाची मनोभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात. महादेवाची मनोभावे पुजा केल्याने अनेक संकट दूर राहतात. सुख, सौभाग्य आणि मनोकामना पुर्ण करण्यासाठी श्रावण सोमवारी खास उपाय करवे.

  • शनिदोषापासून मुक्ती

भगवान शंकराची उपासना केल्यानेही शनिदोषापासून मुक्ती मिळते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की ज्यांच्या कुंडलीत शनि दोष किंवा शनिच्या वाईट प्रभावामुळे त्यांच्या जीवनात अनेक समस्या येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी त्यांनी सोमवारी विधीनुसार महादेवाची पूजा करावी. या दिवशी विशेषतः शिवलिंगाला बेलाचे पान अर्पण करावे. असे केल्याने शनिदोष दूर होतो.

  • आर्थिक समस्या दूर होतात

जेव्हा माता लक्ष्मी नाराज तेव्हा व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही पैशांशी संबंधित समस्या असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी पांढर्‍या स्फटिकाने बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. त्यामुळे पैसा आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

Lord Shiva
  • चंद्र दोषपासून मुक्ती मिळवण्यासाठी

जर कुंडलीत चंद्र दोष असेल तर तुम्हाला त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी महादेवाची पूजा करावी. असे मानले जाते की महादेवाची पुजा केल्याने चंद्रदोषामुळे होणारा त्रास दूर होतो.

  • तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचा उत्तम उपाय

जर तुमची काही विशेष इच्छा असेल जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर सोमवारी भोलेनाताची मनोभावे पूजा करावा. पूजेमध्ये महादेवाला बेलाचे पान, धोतऱ्याचे पांढरे फुल आणि फळ यासारख्या वस्तू महादेवाला अर्पण कराव्यात. या सर्व वस्तू अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT