Toothpaste: मीठ असलेले टूथपेस्ट खरंच चांगले असते का?

Salt in Toothpaste: टूथपेस्टमध्ये मीठ असणे किती फायदेशीर आहे आणि त्याचा दातांवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.
Salt in Toothpaste
Salt in ToothpasteDainik Gomantak
Published on
Updated on

Salt in Toothpaste Good or Bad?: सध्या अनेक लोक दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतात. तसेच टिव्हीवर देखील विविध टूथपेस्टच्या जाहिराती पाहायल मिळते.

टूथपेस्टमध्ये मीठ असते का? असे टूथपेस्ट वापरणे खरंच चांगले असते का? असे प्रश्न तुम्हाला पडले असेल तर याचे उत्तर आज जाणून घेऊया.

  • टूथपेस्टचा शोध कधी लागला?

टूथबिरशचा शोध लागण्यापुर्वीच टूथपेस्टचा शोध लागला असे इतिहासकारांचे मत आहे. इजिप्शियन लोकांनी सुमारे ५ हजार वर्षापूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी पेस्ट बनवली. पण त्यावेळी ते टूथपेस्ट म्हणून ओळखली जात नव्हती.

यानंतर ग्रीक आणि रोमन लोकांनी या प्रकारच्या टूथपेस्टचा वापर केला. जर भारतामध्ये पुर्वी राख किंवा मंजनचा वापर करून दात स्वच्छ केले जात होते. काही वर्षापुर्वी पेस्टचा वापर भारतात सुरू झाला.

Salt in Toothpaste
Trust In Relationship: नातं टिकवण्यासाठी विश्वास का गरजेचा आहे?
Healthy Teeth
Healthy TeethDainik Gomantak

टूथपेस्ट बनवण्यासाठी अनेक प्रकारचे रसायने वापरले जातात. ही रसायने आपल्या दातांचे संरक्षण करतात आणि त्यांना स्वच्छ ठेवतात.

अॅब्रेसिव्ह, फ्लोराईड्स, डिटर्जंट्स आणि ह्युमेक्टंट्स प्रमाणेच त्यात आढळणारे दातांवरील प्लेक काढून टाकण्यास मदत करतात, तर 'फ्लोराइड' दातांवरील इनॅमल मजबूत करून पोकळी रोखण्यास मदत करते. त्याचबरोबर यामध्ये असलेले डिटर्जंट टूथपेस्टमध्ये फेस आणण्याचे काम करते.

तर त्यात असलेले 'ह्युमेक्टंट्स' टूथपेस्टला कोरडे होऊ देत नाहीत. या सर्वांशिवाय टूथपेस्टमध्ये मीठ देखील आढळते. ते आपल्या दातांसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मीठाचे सर्वात मोठे कार्य म्हणजे तोंडातील लाळ वाढवणे.

त्यामुळे तोंडातील जंतू निघून जातात. तेसच मीठ दातांमध्ये असलेले नैसर्गिक इनॅमल कॅल्शियम आणि फ्लोराईडला अधिक संवेदनशील बनवते आणि मीठामध्ये हिरड्यांची जळजळ कमी करण्याची शक्ती असते. म्हणजेच एकंदरीत मीठ हा आपल्या टूथपेस्टचा महत्त्वाचा भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com