goa news | painting Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोमंतकीय शंकर रामाणी यांना चित्रांजली

Goa News: गोमंतकीय कविवर्य शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पणजीत प्रदर्शन भरविले आहे.

दैनिक गोमन्तक

- नितीन कोरगावकर

गोमंतकीय कविवर्य शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राजधानी पणजीत (Panji) 21 जूनपासून अनेक कार्यक्रम सुरू आहेत. वेंगुर्लेकर फाईन आर्ट सेंटरने चित्रांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी 'चित्रांजली' या शिर्षकाखाली प्रदर्शन भरविले आहे.

सांतिनेज येथील ‘सिल्व्हिओ हाईट्स’ इमारतीमधल्या ‘वेंगुर्लेकर आर्ट सेंटर’मध्ये आर्ट सेंटरचे संस्थापक प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांच्यासह गोव्यातील (Goa) नामांकित चित्रकारांची (Painter) चित्रे आहेत. अर्थात त्यात कविवर्य रामाणींची व्यक्तिचित्रे तर आहेतच, परंतु त्यांच्या कवितांचे (Poem) वेगवेगळे मूड, प्रतिमा टिपणारी चित्रेही आहेत. संजय हरमलकर, लक्ष्मण च्यारी, दीपक च्यारी यांनी रामाणींची पोर्ट्रेट छान साकारली आहेत. रामाणींचे व्यक्तिमत्त्व कसे असेल याचा अंदाज त्यातून येतो

महेश वेंगुर्लेकर यांनीही स्केचीसमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे रेखाटले आहे. रामाणींच्या काव्यात डोकावणारे झाड आणि त्याच्याशी निगडित आशय नेमकेपणाने चित्रित केला आहे.

निरूपा नाईक, दिलेश हजारे, शिवप्रसाद किनळेकर, क्रांती च्यारी, सागर नाईक मुळे, नागेशराव सरदेसाई, सिद्धार्थ गाययतोंडे यांनी रामाणींच्या कवितेतील प्रतिमा आणि त्या अनुषंगाने येणारा आशय याला चित्ररूप देऊन या प्रदर्शनात योग्य वातावरण निर्मिती केली आहे.

दीपक गाड यांनी कॅलिग्राफी माध्यमात रामाणींच्या संग्रहांची यादी मांडली आहे. हे प्रदर्शन 30 जूनपर्यंत रसिकांसाठी खुले आहे. प्रथितयश कवयित्री अरुणा ढेरे यांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

SCROLL FOR NEXT