Seeds For Health for Hormonal Balance  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Seeds For Health : हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी या बियांचा करा वापर; अनुभवाल आश्चर्यकारक फायदे

पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहारामुळे इतर आरोग्य समस्यांव्यतिरिक्त आपल्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

दैनंदिन जीवनात आपण जे काही करतो त्यात हार्मोन्सचा मोठा वाटा असतो. जसे कधी झोपावे, काय खावे, किती वेळ चित्रपट पहावे, म्हणजेच दिवसभरात जे काही संकेत मिळतात ते सर्व काही हार्मोन्समुळे घडते. आपल्या मासिक पाळीचे नियमन करण्यापासून ते आपली भूक नियंत्रित करण्यापर्यंत हार्मोन्स जबाबदार असतात. त्याच वेळी, आजकालच्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहारामुळे इतर आरोग्य समस्यांव्यतिरिक्त आपल्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. हार्मोनल आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी कोणता आहार घ्यावा हे जाणून घेऊया.

मोहरी

सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमचा चांगला स्रोत आहेत आणि प्रोजेस्टेरॉन वाढवतात. तुम्ही बिया भिजवून फळांसोबत खाऊ शकता किंवा बिया स्मूदी आणि दह्यामध्ये घालू शकता.

भोपळ्याच्या बिया

या बियांमध्ये ओमेगा ३, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. भोपळ्याच्या बिया सॅलड आणि स्मूदीमध्ये जोडल्या जाऊ शकतात. याशिवाय तुम्ही या बियांचे सेवन फळांसोबत किंवा बटरमध्ये मिसळून करू शकता.

छिया बियाणे

या बियांमध्ये ओमेगा 3, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. छिया बिया मासिक पाळीपूर्वीची लक्षणे कमी करण्यासाठी ओळखली जातात. बिया किमान दोन तास भिजवून ठेवा, मग तुम्ही त्यांना स्मूदी, दही किंवा फळांसोबत खाऊ शकता, असे ती सुचवते.

जवस

अंबाडीच्या बिया ओमेगा 3 आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. ते प्रजनन क्षमता वाढवण्यास आणि इस्ट्रोजेन उत्पादनास मदत करतात. तुम्ही दही, सॅलड, स्मूदी आणि ताक यामध्ये भाजलेले फ्लॅक्ससीड्स खाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT