Sawan Vrat Special Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sawan Vrat Special Recipe: श्रावणातील उपवासाला 'हा' चविष्ठ पदार्थ नक्की ट्राय करा

Sawan Vrat Special Recipe: या सर्व गोष्टी एकदा चांगले मिसळा आणि पीठ तयार करा.

दैनिक गोमन्तक

Sawan Vrat Special Recipe: अधिक श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण म्हटलं की उपवास हा आलाच. आपल्याकडे उपवासालादेखील विविध चवदार पदार्थांची रेलचेल असते. मात्र अनेकदा आपल्यापैकी अनेकजण उपवासाचे तेच-तेच ठरलेले पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात.

महत्वाचे म्हणजे श्रावणातले उपवास बाकीच्या उपवासांपेक्षा वेगळे असतात. प्रत्येक भागातील रुढी-परंपरानुसार ते केले जातात. साहजिकच उपवासाला काय खावे काय खाऊ नये हे त्या-त्या प्रदेशानुसार बदलत जाते.

त्यामुळे उपवासासाठी नवीन एखादा पदार्थ ट्राय नक्की केला जातो. आज आपण असाच एक रुचकर पदार्थ कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत. हा पदार्थ म्हणजे काकडीचे भजी.

काकडी हे एक सुपरफूड आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. काकडी खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. यासोबतच पचनाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. काही भागांमध्ये उपवासाच्या वेळी तांदूळ, गव्हाचे पीठ किंवा फळे उपवासाला खाल्ली जातात.

काही ठिकाणी काकडीदेखील खाल्ली जाते. मात्र तुम्ही काकडीचे भजी खाल्ले आहेत का? आज आपण हा रुचकर पदार्थ कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.

साहित्य:

1. दोन कप पाणी सिंघाड्याचे पीठ

2. चवीनुसार सेंधा मीठ

3. 2 हिरव्या मिरच्या

4. 2 काकडी

5.1/2 टीस्पून धने पावडर

6. 1/2 टीस्पून लाल तिखट

7. 2 कप तेल

  • असे बनवा काकडीचे भजी:

काकडीचे भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी सोलून किसून घ्या. यानंतर त्यातील एकदा पिळून पाणी काढा. एका भांड्यात मैदा, मीठ, तिखट, धनेपूड आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका. या सर्व गोष्टी नीट मिसळा. काही वेळाने त्यात किसलेली काकडी आणि थोडे पाणी घाला. या सर्व गोष्टी एकदा चांगले मिसळा आणि पीठ तयार करा.

कढईत तेल टाकून गरम करायला ठेवा. पॅनमध्ये तयार केलेले पीठ थोडे थोडे घेऊन पकोडे तळून घ्या. ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता तुमचे उपवासाचे काकडीचे पकोडे तयार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT