Relationship Tips: खोटं बोलणं चुकिचचं... पण नातं जपण्यासाठी...

Relationship Tips: पण, मधेच तुमच्या जोडीदाराला मला तुझी आठवण येते असे म्हणाल तर त्यांना तुमचे प्रेम जाणवेल.
Relationship Tips
Relationship TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Tips For Good Relationship: वडिलधारी लोकं नेहमीच आपल्याला शिकवतात की कोणाशीही खोटे बोलू नका.

विशेषत: जेव्हा तुमच्या जोडीदाराचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे कारण तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत घालवायचे आहे.

अशा परिस्थितीत, तुम्ही काही वर्षे खोट्याच्या मदतीने घालवू शकता, परंतु संपूर्ण आयुष्य नाही.

पण, जास्त सत्य बोलण्यानेही लोकांचे नाते बिघडते असे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या कठीण परिस्थीत खोटे बोलत असाल तर त्यात काही गैर नाही.

कधीकधी तुमचे एक खोटे तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखावण्यापासून वाचवते.

नेहमी गिफ्टचे कौतुक करा

जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला एखादी भेटवस्तू दिली असेल तर त्याचे कौतुक करा.

मात्र, तुम्हाला ती भेट अजिबात आवडली नसेल. पण, तरीही समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर करा आणि त्याची स्तुती करा.

जोडीदाराचे मनोबल वाढवा

यार, तू सर्वकाही व्यवस्थित हाताळतोस. केवळ हे एक वाक्य तुमच्या जोडीदाराचे मनोबल वाढवू शकते.

एखादी व्यक्ती घर आणि ऑफिसची जबाबदारी कशीही सांभाळते. काहीवेळा जास्त कामामुळे ते त्यांचे सर्वोत्तम देऊ शकत नाहीत.

त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही खोटे बोलत थोडी स्तुती केली तर समोरच्या व्यक्तीला बरे वाटेल.

स्वयंपाकाचे कौतुक करा

जर तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी प्रेमाने काही बनवले असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या. स्वयंपाकात काही कमतरता असू शकते.

पण जर तुम्ही त्या उणीवाकडे दुर्लक्ष करून त्याची स्तुती केली तर तुमच्या जोडीदाराला ते आवडेल.

Relationship Tips
Tips to Re-issue Passport| पासपोर्ट हरवला आहे? तर मग या मार्गाने बनवा नवीन पासपोर्ट

लुक्सचे कौतुक

जर तुमच्या पार्टनरने नवीन लूक ट्राय केला असेल आणि तुम्हाला ते आवडत नसले तरी त्यांची चेष्टा करू नका.

तेव्हा त्याची स्तुती करा. नंतर नंतर हळू हळू प्रेमाने आपले म्हणणे समोर ठेवले तरी चालेल.

Relationship Tips
Aloe Vera: निरोगी त्वचेसाठी अशी वापरा कोरफड

आय मिस यू...

असे अजिबात शक्य नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराला सतत मिस करत असाल. पण, मधेच तुमच्या जोडीदाराला मला तुझी आठवण येते असे म्हणाल तर त्यांना तुमचे प्रेम जाणवेल. असे केल्याने अनेक वेळा मोठे वादही मिटतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com