नवी दिल्ली: सरकार जंक फूडविरुद्ध कडक पावले उचलण्याची तयारी करत आहे. सिगारेटप्रमाणेच समोसा आणि जलेबीसारखे प्रसिद्ध स्नॅक्स आता 'Injurious to health' असा इशारा देऊन विक्री केले जाऊ शकतात असे वृत्त समोर आले आहे. मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा आणि शहरी तरुणांमध्ये वजन वाढणे ही चिंतेची कारणे आहेत. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय इशाऱ्याचे फलक बसवण्याची तयारी करत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्रालयाने एम्ससह अनेक केंद्रीय संस्थांना असे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. दररोज नाश्ता करताना तुम्ही किती चरबी आणि साखर युक्त पदार्थ आहारात घेत आहात हे स्पष्टपणे सांगितले जाईल. विशेष म्हणजे जंक फूडवर तंबाखूसारखे इशारा देण्याची पहिल्यांदाच तयारी केली जात आहे.
या इशाऱ्याच्या माध्यमातून नागरिकांना अन्नातील साखर आणि तेलाच्या प्रमाण याबद्दल सतर्क केले जाणार आहे. विशेष म्हणजे या यादीत लाडूपासून ते वडा पाव आणि पकोडापर्यंत अनेक खाद्यपदार्थांचा समावेश आहे. लवकरच कॅफे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी इशारे लावले जातील असे वृत्त आहे.
एका अहवालानुसार, २०५० पर्यंत ४४.९ कोटी भारतीय अधिक वजन किंवा लठ्ठपणाचे शिकार होतील, असा अंदाज आहे.
आरोग्य खात्याचा हा उपक्रम मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांविरुद्धच्या लढाईचा एक भाग आहे. हे आजार थेट साखर आणि तेल जास्त असलेल्या आहाराशी जोडलेले आहेत. हे बोर्ड सरकारी कार्यालये आणि संस्थांमध्ये बसवले जातील, अशी माहिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.