Saina Nehwal - Parupalli Kashyap Separation
Saina Nehwal - Parupalli KashyapDainik Gomantak

Saina Nehwal Separation: आणखी एक स्पोट्स स्टार कपल झाले वेगळे; सायना नेहवाल पारुपल्ली कश्यप लग्नाच्या सात वर्षानंतर विभक्त

Saina Nehwal - Parupalli Kashyap Separation: हैदराबादमध्ये दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती आणि २०१८ मध्ये दोघांनीही लग्न केले होते.
Published on

नवी दिल्ली: भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती सायना नेहवाल तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त झाली आहे. रविवारी रात्री उशिरा सायनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही घोषणा केली. १४ डिसेंबर २०१८ रोजी दोघांनी लग्न केले आणि आता ७ वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.

"कधीकधी आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि चांगले आरोग्याची निवड करत आहोत. मी त्या आठवणींसाठी कृतज्ञ आहे आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो," असे सायना नेहवालने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे. सायनाचा पती पारुपल्ली कश्यप देखील एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू आहे.

Saina Nehwal - Parupalli Kashyap Separation
Russian Women: खतरनाक जंगलात लहान मुलींसह गुफेत राहत होती रशियन महिला, गोव्यातून गाठले कर्नाटक; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

सायना नेहवाल ही हरियाणाची रहीवासी आहे. तिने २००८ मध्ये BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २००९ मध्ये, सायना BWF सुपर सिरीज स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती.

सायनाचे क्रीडा जगतात उल्लेखनीय योगदान लक्षात घेता, तिला २००९ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१० मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Saina Nehwal - Parupalli Kashyap Separation
Goa Scholarship: गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी नवी शिष्‍यवृत्ती! 'पर्रीकर’ योजनेचा 50 जणांना मिळणार लाभ; जागतिक संस्थांसाठी वेगळी योजना

सायनाचा ३८ वर्षीय पती पारुपल्ली कश्यप यांनी २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, ते इतर अनेक प्रतिष्ठित स्पर्धांचे विजेताही राहिला आहे. त्यांनी माजी ऑल-इंग्लंड चॅम्पियन प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

सायना हिलाही या खेळात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी एकमेव महिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळाला आहे.

दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली होती, दोघेही दिग्गज प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत होते. येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. २०१८ मध्ये दोघांनीही लग्न केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com