Safe Car Driving Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Safe Car Driving Tips: स्टीयरिंग व्हीलच्या मध्यभागी हात ठेवून गाडी चालवणे धोकदायक, वेळीच व्हा सावध

Safe Car Driving Tips: बरेच लोक गाडी चालवताना स्टीयरिंग व्हीलच्या मध्यभागी हात ठेवतात. असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Puja Bonkile

Safe Car Driving Tips: अनेक लोक गाडी चालवताना स्टीयरिंग व्हीलच्या मध्यभागी हात ठेवतात. यामुळे ते खुप कुल पद्धतीने गाडी चालवत आहे असे वाटते. पण, ही मोठी चूक ठरू शकते.

स्टीयरिंगच्या मध्यभागी एक एअरबॅग दिली जाते जिथे तुम्ही हॉर्न वाजवण्यासाठी दाबता आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी हाताने गाडी चालवता. तेव्हा तुमचा हात एअरबॅगच्या अगदी वर असतो. अशावेळी जर एखादी दुर्घटना घडली आणि एअरबॅग उघडली तर तुमच्या हाताला त्रास होऊ शकतो.

एअरबॅग उघडण्याचा वेग ताशी अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. यासह, जेव्हा एअरबॅग उघडते तेव्हा एक छोटासा नियंत्रित स्फोट होतो. ज्यामुळे स्टीयरिंग प्लास्टिक काढून टाकले जाऊ शकते आणि एअरबॅग बाहेर येऊ शकते.

यामुळे तुमच्या हातातील हाडंही तुटू शकतात. पण, अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. इतकंच नाही तर स्टीयरिंग व्हीलच्या दरम्यान हात ठेवून गाडी चालवल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

स्टीयरिंग व्हीलच्या मध्यभागी हात ठेवून गाडी चालवणे देखील धोकादायक असू शकते. कारण यामुळे कारवरील नियंत्रण गमावण्याचा धोका वाढतो.

जेव्हा तुम्ही तुमचे हात स्टीयरिंग व्हीलच्या मध्यभागी ठेवता, तेव्हा तुमच्याकडे कार वेगाने किंवा अचानक फिरवण्याची क्षमता कमी असते. जर अचानक ब्रेक लावावे लागले किंवा गाडी वळवावी लागली तर अपघात होऊ शकतो.

यामुळे डायव्हरचा थकवाही वाढू शकतो. स्टीयरिंग व्हीलच्या मध्यभागी आपल्या हातांनी गाडी चालवल्यास थकवा जास्त जाणवतो.

कारण कार नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतात.

  • स्टीयरिंग कसे पकडावे

कार सुरक्षितपणे चालवण्यासाठी तुम्ही स्टीयरिंग व्हील घड्याळ्यातील 9 आणि 3 वाजताच्या स्थितीत धरण्याचा प्रयत्न करावा.

यामुळे तुमचे कारवर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत करेल आणि अपघाताची शक्यता कमी करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT