Rupay  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rupay क्रेडिट कार्ड वारताय? मग जाणून घ्या नुकसान आणि फायदे

रुपे क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

rupay card benefits and limitations read details

आजकाल सर्वचजण पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. कारण हे वापरण्यास सोपे आहे. पण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही जितका जास्त खर्च कराल तितके तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकता. अशावेळी तुम्ही क्रेडिट कार्ड योग्य केला पाहिजे.

रुपे क्रेडिट कार्ड स्मार्ट पद्धतीने वापरल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. RuPay क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सादर केले होते. बँका NPCI च्या भागीदारीत RuPay डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करू शकतात.

रुपे क्रेडिट कार्डचे फायदे कोणते

RuPay क्रेडिट कार्डवरील व्यवहार शुल्क व्हिसा आणि मास्टरकार्डपेक्षा कमी आहे. कारण बँका विदेशी क्रेडिट कार्ड कंपन्यांचे व्यवहार शुल्क डॉलरमध्ये ठरवतात. रुपे हे स्वदेशी कार्ड असल्याने, त्यावरील शुल्क रुपयात आकारले जाते.

NPCI ने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे कार्ड खूप मजबूत बनवले आहे. जेणेकरून ग्राहकांना फसवणूक आणि घोटाळ्यांपासून संरक्षण मिळू शकेल.

रुपे कार्डच्या मदतीने पेमेंट किंवा व्यवहार करणे खूप जलद आणि सुरळीत आहे. याचे कारण म्हणजे त्याचे सर्व्हर भारतात आहेत.

वेगवेगळ्या UPI ॲप्सच्या मदतीने RuPay कार्ड वापरून पेमेंट करणे खूप सोपे आहे. कारण तुम्ही ते तुमच्या UPI शी सहजपणे लिंक करू शकता.

रुपे कार्डवर वार्षिक देखभाल शुल्क देखील खूप कमी आहे. यासोबतच त्याची जॉइनिंग फी 500 रुपयांपेक्षा कमी आहे.

तुम्ही RuPay क्रेडिट कार्ड रेस्टॉरंट, व्यवसाय, हॉटेल्समध्येही सहज वापरू शकता.

RuPay क्रेडिट कार्डची मर्यादा

परदेशात हे कार्ड थोड्या प्रमाणात वापरले जाऊ शकते. कारण सध्या परदेशात POM वर RuPay क्रेडिट कार्डला मर्यादित स्वीकृती आहे. पण भारताबाहेर या क्रेडिट कार्डच्या स्वीकाराची व्याप्ती वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड सुरू करण्याचा विचार करत आहे.

RuPay कार्डमध्ये तुम्हाला Visa किंवा MasterCard च्या तुलनेत कमी क्रेडिट मर्यादा मिळतात. अशावेळी मोठी खरेदी करण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

वेगवेगळ्या बँकांच्या RuPay कार्ड मर्यादा भिन्न आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वोत्तम पर्याय शोधण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT