Running Exercise Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Running Exercise Tips: धावताना 'या' गोष्टींची काळजी घेतली नाही तर शरीराला पोहचू शकते हानी

Running Exercise Tips: तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये वेदना जाणवू शकतात.

दैनिक गोमन्तक

Running Exercise Tips: आपल्या निरोगी आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे महत्वाचे असते. व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते. महत्वाचे म्हणजे व्यायामामुळे आपले फक्त शारीरीक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यदेखील उत्तम राहते.

जिम, चालणे, ट्रेकिंग यासोबतच धावण्याला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येते. धावण्यामुळे आपल्याला फायदा तर होतोच मात्र धावताना योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला काही इज्युरीचा सामना करावा लागतो. त्यामुळे धावताना किंवा धावण्याआधी कोणती काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या इंज्युरीचा करावा लागतो सामना?

1. टाचांमध्ये सूज

तुम्हाला अनेकदा असे वाटले असेल की धावताना घोट्याच्या मागच्या स्नायूंना सूज येऊन ताण येणे सुरू होते. जरी ही समस्या सामान्य वाटत असली तरीही ती टाळणे आवश्यक आहे. वेगाने धावण्यामुळे हे अनेकदा घडते.

2. पायाच्या तळव्यामध्ये वेदना

जर तुम्ही धावण्यासाठी चूकीच्या पद्धतीने शूज घालत असाल तर तुम्हाला तुमचे शूज नीट घालणे आवश्यक आहे. हे शूज जर सैल असतील तरीदेखील तुम्हाला तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये वेदना जाणवू शकतात.

3. गुडघेदुखी

अनेक वेळा आपण आवश्यकतेपेक्षा वेगाने धावू लागतो, त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होतो. त्याला पॅटेलोफेमोरल पेन सिंड्रोम असेही म्हणतात. त्यामुळे काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

धावताना या गोष्टींची घ्यावी काळजी

1.धावण्यापूर्वी वार्म-अप करु नका.

2. धावण्यापूर्वी मसल्स आणि बॉडी स्ट्रेच करा.

3. धावताना 2 ते 5 मिनिटांचा ब्रेक घ्या.

4. सुरुवातीला खूप वेगाने धावणे टाळा.

5. धावण्यासाठी आरामदायक शूज घाला.

6. खडबडीत असलेल्या ठिकाणी अजिबात धावू नका.

7. चालवताना मोबाईल आणि इअरफोनचा वापर करु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT