पितृ पक्ष 2021 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पितृ पक्ष 2021: पितृ पक्षाशी संबंधित हे 10 महत्वाचे नियम तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत

पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये पूर्वजांसाठी केलेल्या श्राद्धाला खूप महत्त्व आहे. पूर्वजांचे विधी नुसार श्राद्ध करून त्यांचे आशीर्वाद मिळतात.

दैनिक गोमन्तक

पितृ पक्ष 2021:पितृपक्षाच्या (Pitru Paksha) या 15 दिवसांमध्ये पूर्वजांसाठी केलेल्या श्राद्धाला (Shradha) खूप महत्त्व आहे. पूर्वजांचे विधी नुसार श्राद्ध करून त्यांचे आशीर्वाद (Blessings) मिळतात. पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांना मोक्ष किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध केले जाते.

पितृपक्षात श्राद्ध करण्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे. पुराणांनी श्राद्धाबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. स्कंद पुराणानुसार श्राद्ध केल्याने पुनःजन्म होतो तसेच श्राद्ध केल्याने पूर्वज प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वाद मिळतात पूर्वजांना अपेक्षित अन्न मिळते. श्राद्ध केल्याने व्यक्ती वय, सामर्थ्य, प्रसिद्धी, ज्ञान आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करते, श्राद्ध करण्यासाठी काही नियम देखील बनवले गेले आहेत ते आज आपण जाणून घेऊया.

पितृ पक्षाचे काही महत्वाचे नियम -

  1. शास्त्रानुसार, श्राद्ध नेहमी स्वतःच्या भूमीत किंवा स्वतःच्या घरात केले पाहिजे.

  2. तीर्थक्षेत्र, नदी किंवा समुद्रकिनाऱ्यावरही श्राद्ध करता येते.

  3. श्राद्धासाठी दक्षिणेकडे उतार असलेली जमीन नेहमी शोधली पाहिजे कारण दक्षिणयनामध्ये पूर्वजांचे वर्चस्व असते.

  4. ज्या जमिनीवर श्राद्ध केले जाते ती जमीन पूर्णपणे स्वच्छ केली पाहिजे आणि शेण, गंगा पाणी इत्यादींनी पवित्र केली पाहिजे.

  5. श्राद्धाचा अधिकार फक्त मुलाला देण्यात आला आहे, जर नसेल तर मुलीचा मुलगा म्हणजेच नातू देखील श्राद्ध करू शकतो.

  6. जर एखाद्या व्यक्तीला अनेक पुत्र असतील, तर फक्त ज्येष्ठ पुत्रालाच श्राद्ध करण्याचा अधिकार आहे.

  7. जर कोणाचा मुलगा हयात नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत नातू आणि नातूच्या अनुपस्थितीत पणतू श्राद्ध करू शकतो. तसेच एक विधवा महिला तिच्या मुलगा आणि नातूच्या अनुपस्थितीत पतीचे श्राद्ध करू शकते, परंतु पती-पत्नी ला मुलगा नसेल तरच पत्नीसाठी पती श्राद्ध करू शकतो.

  8. जर कोणाला मुलगा असेल तर त्याने पत्नीसाठी श्राद्ध करू नये. अशा स्थितीत केवळ मुलानेच आईचे श्राद्ध करावे.

  9. ज्याला कोणताही मुलगा किंवा नातू वगैरे नसेल, तर त्याच्या भावाची मुले त्याच्यासाठी श्राद्ध करू शकतात.

  10. शास्त्रानुसार, दत्तक वारस देखील श्राद्ध करण्यास पात्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT