फळांमध्ये (Fruits) लोकं द्राक्ष (Grapes) खाणे खूप पसंद करतात. काही लोकांना फ्रुट चाटमध्ये (Fruit Chaat) द्राक्षे मिक्स करून खाणे आवडते, तर अनेकांना द्राक्षाचा ज्युस खूप आवडतो. जगात द्राक्षांचे अनेक प्रकार आढळतात. काळ्या आणि हिरव्या रंगाची द्राक्षे भारतातही मिळतात आणि ती बाजारात 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज उपलब्ध होतात. पण आज आम्ही तुम्हाला द्राक्षांच्या एका खास जातीबद्दल सांगणार आहोत ज्याला रुबी रोमन (Ruby Roman Grapes) म्हणून ओळखले जाते. (Ruby Roman Grapes is world most expensive grapes)
प्रसिद्ध रुबी रोमन द्राक्षाची किंमत लाखांमध्ये आहे, ज्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र या द्राक्षांना रॉल्स रॉयल मानले जाते. या द्राक्षांमध्ये भरपुर प्रमाणात असेलल्या रसामुळे आणि साखरेमुळे ही इतर जातींपेक्षा वेगळे आणि चांगले आहे असे मानले जाते. रुबी रोमन द्राक्षांचे दरवर्षी 2400 गुच्छे उगवतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याचा आकार पिंग पोंग बॉलसारखा असतो.
जपानी लक्झरी फळ बाजारात रुबी रोमन द्राक्षांना मोठी मागणी आहे. ही द्राक्ष बाजारात विकली जात नाही, पण त्यासाठी बोली लावली जाते. बोलीमध्ये सर्वाधिक रक्कम लावणारा बोलीदार ही द्राक्षे घरी घेऊन जातो. रुबी रोमन द्राक्षाची सुरवात जपानमध्ये 2008 मध्ये करण्यात आली होती. हे जपानच्या इशिकावामध्ये उगवले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी प्रीफेक्चरल अॅग्रीकल्चर रिसर्च सेंटरला या द्राक्षाच्या प्रजाती विकसित करण्याचे आवाहन केले. संशोधन केंद्राने सुमारे दोन वर्षे 400 द्राक्ष वेलींवर अनेक प्रयोग केले. 400 द्राक्षवेलींपैकी फक्त 4 लाल द्राक्षांचे उत्पादन या प्रयोगादरम्यान करण्यात आले होते. या 4 द्राक्षांपैकी एक प्रजाती अशी होती, जीने शेतकऱ्यांची मने जिंकली.
रुबी रोमन द्राक्षे 'इशिकावाचा खजिना' म्हणूनही ओळखली जातात. त्याच्या लागवडी दरम्यान, द्राक्षांच्या आकार, चव आणि रंगाची विशेष काळजी घेतली जाते. या विशिष्ट प्रजातीच्या एका द्राक्षाचे वजन सुमारे 20 ग्रॅम आहे. एका गुच्छात सुमारे 24 द्राक्षे असतात. रुबी रोमनच्या गुच्छाची किंमत 12 लाख येन म्हणजेच 2019 मध्ये सुमारे 7 लाख 55 हजार रुपये होती. याचा अर्थ एका द्राक्षाची किंमत सुमारे 35000 रुपये आहे. अशा स्थितीत एका द्राक्षासाठी आपला संपूर्ण पगार खर्च होऊ शकतो. आणि विशेष सांगायचे झाले तर जपानमध्ये फक्त द्राक्षांची किंमत सर्वात जास्त आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.