Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship: नात्यात कटूता असूनही महिला का टिकवतात नातं? जाणून घ्या कारण

Relationship Tips: अनेकदा नात्यात कटूता असून देखील महिला नातं जुळवून ठेवतात.

Puja Bonkile

relationship tips why women stay in toxic and abusive relationship read full story

नात्यात प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. पण अनेक नाती अशी असतात जी टॉक्सीक असतात. पण तरीसुद्धा काही महिला नात्यातून बाहेर पडत नाही. यामागे कोणती कारमे असू शकतात हे जाणून घेऊया.

आर्थिकदृष्ट्या अवलंबून

सर्वात महत्वाचे महिला आर्थिकदृष्ट्या अवलंबून असल्याने नात्यात टोकाचा निर्णय गेत नाही. जेव्हा एखादी महिला आपल्या पतीवर पूर्णपणे अवलंबून असते तेव्हा तिला वेगळे होण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. जेव्ह तीला मुले असतील तेव्हा ती नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करत नाही. यामुळे महिलांनी स्वावलंबी बनवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या स्वतःच्या बाजूने उभ्या राहू शकतील आणि अशा आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य मिळवू शकतील.

आत्मविश्वासाचा अभाव

महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याने त्या नात्यातून बाहेर पडत नाही. जोडीदारावर अवलंबून राहिल्यामुळेही ही समस्या निर्माण होते. विभक्त झाल्यानंतर जीवन कसे असेल यासारख्या चिंतेमुळे त्या नात्यात सर्व गोष्टी सहन करतात.

बदल होण्याची शक्यता

महिलांना सकारात्मक बदलांची अपेक्षा असते. त्यांना वाटते की त्यांचे प्रेम आणि वागणूक त्यांच्या जोडीदाराच्या वागण्यात एक दिवस नक्कीच बदल घडवून आणेल. अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही, पण हजारो प्रयत्न करूनही जर तुमच्या जोडीदाराचे वागणे बदलत नसेल तुम्हाला योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.

भावनिक होणे

महिला या पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात. एकत्र राहताना त्या केवळ आर्थिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही त्याच्या जोडीदारावर अवलंबून असतात. ही गोष्ट टॉक्सिक नातेसंबंधातून बाहेर पडण्याच्या मार्गावरही येते. यामुळे अनेकदा महिला आवाज उठवण्याऐवजी गप्प राहतात.

एकटेपणाची भीती

माणूस एकटेपणा सहन करू शकत नाही. पण टॉक्सिक नातेसंबंधात राहण्यापेक्षा ते खूप चांगले आहे. महिला अनेकदा एकटेपणाबद्दल विचार करून वेगळे होण्याचा विचार करत नाही. आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे त्या वेगळे न होता नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT