Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: जोडीदारासोबत पहिल्यांदाच फिरायला जाताय? 'या' गोष्टी करा ज्या प्रवासाला अविस्मरणीय बनवतील...

लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी सोबत वेळ घालवणे गरजेचे असते

Puja Bonkile

Relationship Tips: लग्नानंतर तुम्हीही पहिल्यांदाच जोडीदारासोबत फिरायला जात असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे तुम्ही प्रवास अविस्मरणीय बनवू शकता. लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी सोबत वेळ घालवणे गरजेचे असते. तुम्हालाही जर जोडीदारासोबतचा पहिला प्रवास अविस्मरणीय करायचा असेल तर पुढिल गोष्टी लक्षात ठेवा.

आवडी निवडीवर लक्ष द्यावे

पहिल्या प्रवासात तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडीवर लक्ष द्यावे. जसे की तुमच्या जोडीदाराला काय खायला आवडते काय नाही.तसेच कुठे फिरायला जायला आवडेल हे ही जाणून घ्या. यामुळे तुम्ही एकमेकांना समजुन घेऊ शकता. जर तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जोडीदारावर लादत असाल तर तुमचे नाते बोरिंग होऊन तुटू शकते. यामुळे पहिल्या प्रवासात अशी चूक करणे टाळा.

पॅनिक होणे

अनेकदा काही लोक प्रवास करताना छोट्या छोट्या गोष्टींमुळे पॅनिक होतात. त्यामुळे अनेकवेळा त्यांची तब्येत बिघडते आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाही. तर अनेक लोक प्रवासात काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाही तर जोडीदारावर चिडचिड करतात. यामुळे प्रवासाचा आनंद खराब होतो. यामुळे प्रवासात कधीच पॅनिक होऊ नका.

एकत्र वेळ घालवा

जोडीदारासोबत पहिल्यांदाच फिरायला जात असाल तर मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये वेळ न घालवता जोडीदाराला वेळ द्यावा. नवनव्या ठिकाणी फिरालया जावे. एकमेकांना गोष्टी शेअर कराव्या. यामुळे एकमेकांना समजुन घेण्यास मदत होईल.

बॅग उचलण्यास मदत करणे

तुम्ही दोघे पहिल्यांदा प्रवासाला जात असाल तर तो अविस्मरणीय बनवा. पण याचा अर्थ असा नाही की स्वत: च प्रवासाचा आनंद घ्यावा. पुढाकार घेऊन बॅग उचलण्यास मदत करावी. यामुळे जोडीदाराला देखील मदत होईल. प्रवासात काही छोट्या गोष्टींमुळे देखील नात्यात प्रेम वाढते.

जोडीदाराची काळजी घ्यावी

प्रवासात दोघांनीही एकमेकांची काळजी घ्यावी. दोघांनीही एकमेकांना समान प्रेम आणि आदर द्यावा. प्रवासातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावा.

औषध आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टी

प्रवास करताना नेहमी औषध सोबत ठेवावे. तसेच बॅगमध्ये काही खाण्यापिण्याचे पदार्थही ठेवावे. यावरून जोडीदाराला तुमचे केअरिंग नेचर देखील दिसून येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT