Warm Water: अनेक लोक चेहरा धुण्यासाठी प्रत्येक हंगामात गरम पाणी वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का रोज गरम पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते. तुम्हाल वाटत असेल की गरम पाण्याने चेहरा धुतल्यास स्वच्छ होत असेल, तर हा एक गैरसमज आहे. रोज गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेच्या अनेक समस्या उद्भवु शकतात.
1) चेहरा ड्राय पडतो
गरम पाणी तुमच्या त्वचेतील सर्व नैसर्गिक तेल काढून घेते. त्यामुळे तुमची त्वचा ड्राय पडते. जर तुम्ही सतत गरम पाणी वापरत असाल आणि त्वचेवरील ड्रायनेसकडे दुर्लक्ष करत असाल तर त्वचेसंबंधित आजारांना बळी पडू शकता.
2) संसर्ग वाढतो
गरम पाण्याने तुमचा चेहरा धुतल्याने तुम्हाला खाज सुटणे, जळजळ होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना या समस्यांचा जास्त त्रास होतो.
3) सुरकुत्या
गरम पाण्याने चेहरा धुतल्यास तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात. यामुळे तुम्हाला अकाली वृद्धत्वाला सामोरे जावे लागु शकते.
4) पिंपल्स येतात
गरम पाण्याने चेहरा धुतल्यास रक्ताभिसरण वाढते. यामुळे त्वचेवर लालसरपणा लवकर येतो. तसेच त्वचेवर पिंपल्स येणे, सूज येणे आणि खाज सुटणे यासारख्या समस्या वाढू शकतात.
5) बारिक पुरळ
गरम पाण्याचा जास्त वापर केल्यास तुमच्या त्वचेवर बारिक पुरळ तयार होऊ शकतात. तसेच चेहऱ्यावर डाग पडू शकतात. यामुळे गरम पाण्याचा वापर कमी करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.