Relationship: कोणतेही नातं टिकून ठेवण्यासाठी प्रेम आणि विश्वास गरजेचा असतो. तसेच जोडप्यांनी बोलतांना देखील काळजी घ्यायला हवी. कारण कधी कधी नकळतपणे आपल्या बोलण्यामुळे समोरचा व्यक्ती दुखावतो आणि नात्यात दुरावा येऊ शकतो. यामुळे पती-पत्नीने बोलतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
मला तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होत आहे
लग्नाबद्दल पश्चात्ताप व्यक्त करणे तुमच्या जोडीदारासाठी खूप वेदनादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम तर कमी होईलच पण विश्वासही कमी होईल. अशावेळी दुख व्यक्त करण्याअवजी येणाऱ्या समस्यांना एकत्रितपणे सामोरे जावे.
तु तुझ्या पालकांसारखा आहे
तुमच्या जोडीदाराची त्यांच्या पालकांशी तुलना करणे तुमच्या नात्यासाठी वाईट ठरू शकते. असे बोलल्याने तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशावेळी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल तर त्याबद्दल थेट जोडीदाराशी बोलावे.
माझं लग्न दुसर्याशी झालं असतं तर...
दुसऱ्याशी लग्न करण्याची तुमची इच्छा व्यक्त केल्याने तुमच्या जोडीदाराला खुप दुख: होऊ शकते. हे सर्व सांगण्याऐवजी तुम्ही तुमचे सध्याचे नाते सुधारणे गरजेचे आहे.
माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही
हे शब्द तुमच्या जोडीदारासाठी खूप कठोर आहेत. तुमचं नातं तुटू शकते. जर तुम्हाला तुमच्या प्रेमाबद्दल थोडीशीही शंका असेल तर कपल काउंसिलिंगची मदक घ्यावी.
सर्व समस्यांचे कारण तूच आहेस
वैवाहिक जीवनातील सर्व समस्यांसाठी जोडीदाराला दोष देल्यास त्याला खुप वाईट वाटू शकते. यामुळे कोणतीही समस्या कमी न होता जास्त वाढेल. यामुळे दोघांचे नातं कमकुवत होते. कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देणे आणि एकमेकांना दोष न देणे महत्वाचे आहे.
तु खूप वाईट पालक आहे
तुमच्या जोडीदाराचा त्याच्या पालकत्वाच्या कौशल्याबद्दल अपमान करणे तुमच्या नात्यासाठी धोकादायक ठरू शकते. पालकत्वाबाबत जोडीदाराशी किरकोळ भांडणे होणे सामान्य आहे. पण मुलासमोर एकमेकांशी आदराने बोलावे. कारण तुमच्या वागण्याचा मुलांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.