Relationship Tips:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: फोनमुळे नातं होऊ शकते कमजोर; जाणून घ्या फोन मॅनर्स म्हणजे काय?

जर तुम्हाला फोन मॅनर्सबद्द्ल माहिती नसेल तर ही बातमी नक्की वाचा.

Puja Bonkile

Mobile Manners Build Strong Relationship: आजकाल प्रत्येक गोष्टीत मॅनर्स असणे गरजेचे आहे. मग ते ऑफिसमध्ये सहकाऱ्याशी बोलतांना असो की मग मोबाईल संबंधित असो. तसे तर फार कमी लोकांना फोन मॅनर्सबद्दल माहिती नाही. पण फोन मॅनर्स तुमच्या नात्यात गोडवा किंवा दुरावा आणु शकतो. चला तर मग जाणून घेऊया फोन मॅनर्स कोणते आहेत.

कॉल न उचलणे

मोबाईलमुळे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. जर एखाद्या नातेवाइकाने किंवा ओळखीच्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केला आणि तुम्ही तो रिसिव्ह करत नसाल ते योग्य नाही. तुम्हाला वारंवार कॉल करत असेल आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर नात्यात कटुता येऊ शकते. यामुळे तुम्ही जर कामात असाल तर नंतर कॉलबॅक करावा.

चोरून मोबाईल चेक करणे

अनेक महिला आपल्या पतीचा मोबाईल चोरून चेक करतात. असे करणे म्हणजे संशय घेणे होणे. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. यामुळे चोरून मोबाईल चेक करू नये. तुम्हाला मोबाईल पाहायचा असेल तर तुम्ही मोबाईल मागु शकता आणि चेक करू शकता.

स्टेटस ठेवणे

अनेक लोक मोबाईल इतरांचे स्टेटस ठेवतात. यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ ठेवतात. यामुळे समोरच्या व्यक्ती नाराज होऊ शकतो. यामुळे समोरच्या व्यक्तीची परवानगी घेऊनच त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या स्टेटसवर ठेवाव. अन्यथा तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते.

न विचारता नंबर देणे

अनेकेळा लोक न विचारता इतरांना मोबाईल नंबर देतात. यामुळे कॉल आल्यावर संबंधित व्यक्तीची गैरसोय होऊ शकते आणि आपण त्याचा नंबर दिला आहे हे कळल्यानंतर त्याच्याशी आपले नाते बिघडू शकते. म्हणून, कोणाचाही नंबर इतर कोणत्याही व्यक्तीला न विचारता शेअर करू नये.

कॉलवर दुसऱ्याला बोलायला लावणे

कोणीतरी तुम्हाला कॉल केला आणि जर तुम्ही स्वतःन बोलता तुमच्या कुटुंबातील दुसर्‍या सदस्याचा कॉलवर बोलायला लावत असाल तर हे करणे चुकुचे आहे. यामुळे कॉल करणारी व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते किंवा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. कॉल कोणी रिसिव्ह केला तरीही तुम्ही बोलू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT