Love and Friendship  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: 'जोडीदार, मित्र, lover' सगळं एकच माणसात शोधणं कितपत योग्य?

Dating Advice In Marathi: खरं तर, माणूस आपल्या पार्टनरमध्ये केवळ नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसीची भूमिका न पाहता, एक खास मित्र किंवा मैत्रीण शोधत असतो. आपल्याला नेहमी कोणीतरी असं हवं असतं, जो आपल्याला समजेल आणि ओळखेल.

Akshata Chhatre

Should Boyfriend or Girlfriend considered your best friend

पणजी : आजच्या काळात, "माझा जोडीदार हाच माझा बेस्ट फ्रेंड असावा," ही भावना नात्यांमध्ये खूप महत्त्वाची बनली आहे. सोशल मीडियापासून ते लग्नसमारंभापर्यंत, सगळीकडे याच कल्पनेचा बोलबाला आहे. खरं तर, माणूस आपल्या पार्टनरमध्ये केवळ नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसीची भूमिका न पाहता, एक खास मित्र किंवा मैत्रीण शोधत असतो. आपल्याला नेहमी कोणीतरी असं हवं असतं, जो आपल्याला समजेल आणि ओळखेल. मैत्रीचं नातं हे खरं तर खूप पारदर्शक असतं, त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्ती म्हणजेच आपला पार्टनर आपला मित्र असावा असं वाटणं स्वाभाविक आहे. पण आपल्या पार्टनरकडून बेस्ट फ्रेंड बनण्याची अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे?

मैत्री आणि प्रेम यातील समान दुवा कोणता?

अमेरिकेतील मानसोपचारतज्ज्ञ आणि रिलेशनशिप कोच अलेक्झांड्रा सॉलोमन यांनी रिइमॅजनिंग लव्ह या पॉडकास्टमध्ये मैत्री आणि प्रेम याविषयावर मत मांडले आहे. त्या म्हणतात, प्रेमात आपण काय शोधतो? जी व्यक्ती आपल्याला समजून घेईल, काळजी घेईल. आपण मैत्रीतही हेच तर शोध असतो. आपण जिव्हाळा शोधत असतो, आपलं कौतुक करणारा मित्र शोधत असतो.

अपेक्षांचं ओझं झेपणार का?

Love Factually या पॉडकास्टमध्ये डॉ. फिंक हे जोडीदार हा चांगला मित्र असावा का याविषयी म्हणाले, "सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकाच व्यक्तीकडून ऐवढ्या अपेक्षा ठेवणं हे नात्यात ओझं ठरणार नाही ना? हे लक्षात घेतले पाहिजे. एकाच व्यक्तीकडून प्रेम, मैत्री, खर्च शेअर करणे, भविष्यात मुलांची जबाबदारी स्वीकारणं ऐवढ्या अपेक्षा ठेवल्या जातात. यातून जवळीक वाढते हे जरी खरं असलं तरी या अपेक्षांचं पुढे जाऊन ओझं होऊन नातं तुटण्याची शक्यताही असते."

भावनिक आधारासाठी तुम्ही नवीन मित्र शोधू शकता का?

जोडीदाराकडून मैत्री आणि प्रेम अशा दोन्ही अपेक्षा ठेवणं हे चुकीचं असं नाही. पण हा तुम्ही मैत्रीसाठी नवीन पर्याय शोधू शकता. डॉ. सॉलोमन म्हणतात, माझं नवऱ्यावर प्रेम आहे. 26 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. पण माझा नवरा हा माझा चांगला मित्र नाही. माझी जवळची एक मैत्रिण आहे, भावनिक आधार म्हणून आम्ही एकमेकींकडे बघतो.

रिसर्चमध्ये काय म्हटले आहे?

Headspace या वेबसाईटवरील लेखात अमांडा जेसलमन यांनी पतीपत्नीबाबत एका संशोधनाचा दाखला दिला आहे. एका रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की रिलेशनशिपमध्ये आल्यावर बऱ्याचदा स्त्री आणि पुरुष दोघेही त्यांच्या मित्रपरिवारापासून दुरावतात. यामागचं कारण काहीही असलं तरी अभ्यासातून हे वास्तव समोर येतं.

अमेरिका असो किंवा युरोप किंवा आशिया सर्वत्र कमीअधिक प्रमाणात हेच चित्र आहे. अशा वेळी समजा तुमचा जोडीदार हा कामानिमित्त बाहेरगावी गेला किंवा गंभीर आजाराने ग्रासले असेल अशा वेळी तुम्हाला भावनिक आधाराची आवश्यकता असते. अशा काळात तुमची मित्रमंडळी तुमच्यासोबत असतील तर फायदा होतो. त्यामुळे जोडीदाराकडून मैत्री आणि प्रेम अशा दोन्ही अपेक्षा ठेवणं टाळावं.

नात्यात आनंदी असणं महत्त्वाचं

प्रत्येक नातं हा एक प्रवास आहे. या प्रवासात अनेक वळणं येतात, अनेक अनुभव येतात. त्यामुळे नात्यात मैत्री आणि प्रेम यांचा समन्वय असावा, पण कुठलीही एक भूमिका खूप प्रबळ नसावी. तुमच्या पार्टनरला ते जसे आहेत तसेच स्वीकारा, आणि त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण नातं हे देवाण-घेवाणीचं एक संतुलन आहे. शेवटी, तुमचा जोडीदार तुमचा बेस्ट फ्रेंड असावा की नाही, हा तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही दोघेही तुमच्या नात्यात आनंदी आणि समाधानी असणं हे महत्त्वाचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT