Rejection Trauma Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rejection Trauma: तुमच्या मनातही सतत हीच भीती असते का?

तुमच्याही मनात नाकारण्याची भीती असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

What is Rejection Trauma: तुमच्याही मनात नाकारण्याची भीती असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की समोरच्या व्यक्तीने नेहमीच आपले म्हणणे काळजीपुर्वक ऐकावे आणि त्याच्याशी सहमत असावे.

पण नेहमीच असे होईल असे नाही. अशावेळी अनेक लोक या गोष्टी मनाला लावून घेत नाहीत तर काही लोक निराश होतात.

याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर होतो. यालाच रिजेक्शन ट्रॉमा म्हणतात.

  • रिजेक्शन ट्रॉमा म्हणजे काय?

रिजेक्शन ट्रॉमा ही एक मनोवैज्ञानिक प्रतिक्रिया आहे. यामध्ये व्यक्तीला नेहमीच नाकारण्याची भीती असते. ही समस्या अचानक उद्भवत नाही.

अनेक वेळा लहानपणी आलेले वाईट अनुभव, काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये मिळालेला नकार,कामातील अडचणी, जवळच्या व्यक्तींमधील स्वभावामध्ये झालेला बदल, वैयक्तिक आयुष्यातील विश्वासघात यासारख्या अनेक गोष्टी या समस्येची कारणे असू शकतात.

  • लक्षणे

रिजेक्शन ट्रॉमा असलेले लोक इतरांना भेटण्यास टाळतात. त्यांना असे वाटते की त्यांनी काही सांगितले तर लोक त्यांची चेष्टा करतील. या विचारामुळे त्यांना दुःख, राग, भीती आणि लाज यासारख्या भावनांना सामोरे जावे लागते.

अशा परिस्थितीत तो व्यक्ती कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार होत नाही. कोणत्याही कामासाठी तो स्वत:ला योग्य समजत नाही.

या अवस्थेत ती व्यक्ती ट्रॉमा या समस्येला बळी पडतो. यामुळे त्या व्यक्तीला नाकारत नसले तरी त्याचा भ्रमनिरास होतो. त्याचा आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो.

मनात स्वत: बद्दल वाईट विचार करू लागतो. यामुळे प्रत्येक वाईट गोष्टींसाठी तो स्वत: ला दोष देऊ लागतो.

या समस्येपासून बचाव करण्यासाठी आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करावा. आपल्या कुटूंबातील किंवा जवळच्या व्यक्तींसोबत या समस्या शेअर कराव्या.तसेच तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचा देखील सल्ला घेऊ शकता. यामुळे तुमच्या समस्येवर लगेच उपचार सुरू होऊ शकतो
डॉ. ओम प्रकाश वरिष्ठ मानसोपचारतज्ञ
  • उपाय

हा ट्रॉमा टाळण्यासाठी आत्म-जागरूकता आवश्यक आहे. यामुळे व्यक्तीचा रिजेक्शन ट्रॉमा कमी करण्यास मदत करते. नकारात्मक विचारांपासून दूर कसे राहायचे हे पीडित व्यक्तीला स्वतःला समजले पाहिजे.

यासाठी "कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी'चीही मदत घेता येते. मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेतल्यासही आत्मविश्वास परत येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

Devachi Punav: तरंगांची होणारी शारदीय चंद्रकळेच्या आल्हाददायक प्रकाशातली भेटाभेट, ‘देवाची पुनाव'

IND vs WI 2nd Test: 23 वर्षांनी पुन्हा तोच 'इतिहास'! शतक हुकले तरी साई सुदर्शनने केला मोठा कारनामा; दिल्लीत पुन्हा डावखुऱ्या फलंदाजाचा दबदबा VIDEO

National Coconut Conclave Goa: "नारळ - काजूची लागवड वाढवा"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Viral Video: ट्रान्सफॉर्मर उतरवणाऱ्या 'भाई'चा जुगाड व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली मजा; म्हणाले, 'याला तर भारतरत्न द्या...'

SCROLL FOR NEXT