Conch Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Conch: नियमित शंख वाजवल्याने होतात अनेक लाभ... वाचा

गोमन्तक डिजिटल टीम

हिंदू सनातन धर्मात शंख शुभ आणि मंगल गोष्टीचे प्रतीक मानले जाते. शंख हे जगभर प्रचलित असलेले नैसर्गिक वाद्य आहे. रणवाद्य म्हणून त्याची प्रसिद्धी होती. शंखाच्या टोकाला भोक पाडून त्यावर फूंकून वाजविण्यासाठी पितळी वाटीच्या आकाराचे मुखरंध्र बसवतात. शंकराच्या देवळात विशेषकरून जंगम हे वाद्य वाजवितात. भारतात फार प्राचीन काळापासून हे प्रचलित आहे. जुन्या काळी लांब नळी लावलेले शंख वाद्य असे.  प्रामुख्याने शंखाचे वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख असे दोन प्रकार आढळतात.

शंख वाजवण्याचे फायदे-

  • असे म्हटले जाते की, शंख वाजवल्यामुळे घरामध्ये Positive Energy (सकारात्मक ऊर्जा) पसरली जाते. त्याचबरोबर शंख वाजवणे आपल्या शरीराला देखील, आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. शंख वाजवल्यामुळे गॅस्ट्रिक आणि पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटकारा मिळतो. त्याचबरोबर पोटाच्या विकारांना दूर ठेवण्यास मदत होते.

  • शंख वाजवल्यामुळे आपल्या शरीरातील छातीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. शंख वाजवल्यामुळे आपल्या गळ्याचे जे स्नायू आहेत, त्यांचादेखील व्यायाम होतो. विकल कॉर्ड आणि थायरॉईडशी संबंधित असणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

शंख वाजवण्याचे आणखी काही फायदे-

  • शंख वाजवल्याने चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. तसेच चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या येणे थांबते. शंख वाजवत असताना शरीरात रक्तप्रवाह वेगाने होतो. त्याचबरोबर कैद गळण्याची समस्या असेल तर तीदेखील दूर होते.

  • स्नायू मजबूत होतात- शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.

  • त्वचा रोग दूर होतात- रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

शंख कसा वाजवावा -

  • शंख वाजवता येण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे खोल, भरपूर श्वास भरुन घेता येऊन, तो हळूहळू पण योजनाबद्ध पद्धतीने सोडता येणे. प्राणायामाचा आणि विशेषतः अनुलोम-विलोम प्राणायामाचा अभ्यास असेल तर ही पायरी जड जात नाही.

  • शंखावरच्या ज्या छिद्रातून तो फुंकायचा असतो, त्या छिद्राभोवती आपले तोंड कसे ठेवायचे त्याचीही एक विशिष्ट पद्धत असते. सरावानेच ती ध्यानात येते. त्या पद्धतीत थोडा जरी बदल झाला तरी मग शंख वाजण्याच्या ऐवजी लज्जा-जनक-वायु प्रमाणे विनोदी ध्वनि निर्माण होतात.

  • तोंडातून कशा पद्धतीने हवा सोडायची याचेही एक तंत्र आहे. ते एकदा जमले की परत चुकत नाही. मात्र ते जमेपर्यंत पेशन्स हवा.

  • या सगळ्यातून पार पडल्यावर, सुरुवातीला काही सेकंद शंख वाजतो - परत हवा सोडली तरी वाजत नाही. ज्याप्रमाणे सायकल शिकताना सुरुवातीला काही पॅडल्स तोल सांभाळून चालवता येते, पुन्हा तोल जातो, त्याप्रमाणेच हे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT