Maintain Fitness Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Maintain Fitness: धकाधकीच्या जीवनात कसा जपावा फिटनेस

नियमित व्यायामामुळे शरीर आपोआपच फिट होत जातं.

Ganeshprasad Gogate

सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. मिनिटा-मिनिटाला महत्व प्राप्त होऊ लागल्याने प्रत्येकाचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागलंय. धकाधकीच्या जीवनात प्रत्येक बाबतीत एवढी स्पर्धा वाढली आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, इतरांच्या बरोबरीने धावण्यासाठी आपल्याला आपला फिटनेस सांभाळणं काहीसं कठीण बनत चाललं आहे. मात्र अशामुळे कमी वयातच आरोग्याच्या तक्रारी सुरू झालेल्या अनेक व्यक्ती आपण आपल्या आजुबाजूला बघत आहोत. प्रचंड काम असूनही तुम्ही स्वत:च्या फिटनेसबाबत जागरूक राहू शकता, तुमचं वजन यंत्रणात ठेवू शकता. यासाठी काही टिप्स मात्र फॉलो कराव्या लागतील

1. आहार योग्य आणि प्रमाणातच हवा-

आपल्या शरीराला ठराविक कॅलरीची गरज असते. आपल्या पचनशक्तीनुसार आपल्याला काय पचत आणि काय पचत नाही याचा विचार करावा. आपण ज्या परिसरात जन्मलो- वाढलो त्या परिसरात पिकणारे अन्न- धान्य आपल्या शरीराला पोषक असते. आपल्या कामाचे स्वरूप, आपल्या भुकेची क्षमता याचे स्वरूप ठरवून आहाराची रचना करावी. ज्यांची पचनशक्ती उत्तम असते त्यांनी दर तासाने खावं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण हे भरपेटच करावं. तुलनेने संध्याकाळचं - रात्रीचं जेवण कमी घ्यावं.

2. झोपण्या- उठण्याची वेळ नक्की करा-

आपण व्यायाम करतो, डाएटिंग आपलं एकदम मस्त आणि शिस्तीत सुरू आहे. मग थोडंजागरणं केलं किंवा सकाळी आरामात उठलं तर काय बिघडलं, असा अनेक तरुणाईचा समज असतो. पण दररोज रात्री ११- १२ वाजता किंवा त्याही नंतर झोपण्याची सवय असेल तर ती चुकीची आहे. अपूरी झोप तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते. त्यामुळे ७ ते ८ तासांची रात्रीची झोप घेणे अतिशय आवश्यक आहे.

3. व्यायामात सातत्य -

रोज सकाळी प्रत्येकाने थोडा फार व्यायाम करावाच. जे कष्टाची कामं करतात त्यांनी किमान प्राणायाम, सूर्यनमस्कार, शवासन असे प्रकार तरी करावेत. सूर्यासन हा सर्वांगसुंदर व्यायामप्रकार सांगितलं आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची आसनं, ध्यानमुद्रा केल्याने शरीराला बराच फायदा होतो. जे लोक जिम मध्ये जातात त्यांनी न चुकता आणि काळजी पूर्वक व्यायाम करावा. नियमित व्यायामामुळे शरीर अधिक फिट होत जातं.

4. मानसिक आरोग्यही महत्त्वाचेच-

आपण फक्त शरीराने फिट असून चालत नाही तर मनानेसुद्धा तितकेच फिट असणे आवश्यक असते. सतत चिंता करत राहणं, शोक, दुःख करत राहणं, चिडचिड करणं, घडून गेलेल्या घटनांचा विचार करत राहणं, उदासीन राहणं हे प्रकार माणसाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतात. अशामुळे कुठलेही काम करण्याचा उत्साह राहत नाही. यासाठी नवनवीन पुस्तके वाचावीत, नवनवीन ठिकाणी भेटी द्याव्यात, जे लोक नेहमी क्रियाशील असतात अशांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

SCROLL FOR NEXT