Red Wine Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Red Wine Health Benefits : कोण म्हणतं वाईट! 'रेड वाईन'चे शरीराला फायदेही आहेत, पण...

Red Wine Health Benefits : रेड वाईनमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात.

दैनिक गोमन्तक

मद्याचे नाव ऐकताच सर्वात पहिली गोष्ट लक्षात येते की मद्यपान आरोग्यासाठी चांगले नाही. पण जेव्हा रेड वाईनचा विचार केला जातो तेव्हा हा विचार थोडा बदलणे योग्य ठरेल. द्राक्षांचा वापर करून रेड वाईन बनवली जाते आणि याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

रेड वाईनमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. याशिवाय रेड वाईनमध्ये प्रोअँथोसायनिडिन, रेझवेराट्रोल, कॅटेचिन आणि एपिकेटचिन नावाचे घटक असतात. या सर्व घटकांमुळे, रेड वाईन हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करण्यास मदत करते.

हे फायदे असूनही, हे लक्षात ठेवले पाहिजे की रेड वाईनचा वापर मर्यादित प्रमाणातच केला पाहिजे. तरच त्याचे फायदे मिळू शकतात. रेड वाईन जास्त प्रमाणात प्यायल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आता जाणून घेऊया रेड वाईनचे आरोग्यदायी फायदे. (Red Wine Health Benefits)

Red Wine Health Benefits

रेड वाईन पिण्याचे फायदे

1. टाइप-2 मधुमेहावर रेड वाईन प्रभावी

रेड वाईन प्यायल्याने महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. वाईनमध्ये असे अनेक घटक असतात जे शरीरातील इन्सुलिनची पातळी राखतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. (Red Wine Health Benefits in Marathi)

Red Wine Health Benefits

2. कर्करोगाचा धोका कमी होतो

रेझवेराट्रोल आणि इतर अँटीऑक्सिडंट्स वाईनमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. रेड वाईनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात ज्यामुळे शरीरातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका कमी होतो.

Red Wine Health Benefits

3. नैराश्य दूर करा

वाईन पिणाऱ्या लोकांना नैराश्याचा त्रास कमी होतो हे अनेक संशोधनातून समोर आले आहे. यामध्ये असलेले रेझवेराट्रोल मेंदूतील सेरोटोनिन वाढवते, ज्यामुळे मूड फ्रेश राहतो.

Red Wine Health Benefits

4. वेदनेपासून आराम

रेड वाईनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे वेदनेपासून आराम देतात. विशेषत: संधिवाताच्या आजारात ते प्यायल्याने वेदना बऱ्याच अंशी कमी होतात.

Red Wine Health Benefits

5. स्ट्रोकचा धोका होतो कमी

रेड वाईनवरील संशोधन असे सूचित करते की जे लोक वाईन पितात. त्यांची शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता कमी होते.

Red Wine Health Benefits

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT