Doughnut Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Doughnut Recipe: मुलांसाठी घरीच झटपट बनवा बटाट्यापासून डोनट, नोट करा रेसिपी

Doughnut Recipe: जर तुमच्या मुलांना डोनट खायला आवडत असेल तर घरीच स्वादष्ट डोनट तयार करू शकता.

Puja Bonkile

Potato Doughnuts Recipe: बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. बटाट्यापासून पदार्थ बनवणे सोपे आहे. जवळजवळ प्रत्येक घरात ते वेगवेगळ्या प्रकारे तयार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात बटाट्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.

अनेकांना मांसाहारी पदार्थांसोबत बटाटे खायला आवडतात आणि असे अनेक पदार्थ आहेत ज्यांची चव बटाट्याशिवाय अपूर्ण आहे. बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्चमुळे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. 

बटाट्याचा वापर भाजी बनवण्यासाठी केला जात असला तरी त्यापासून विविध प्रकारचे स्नॅक्सही बनवता येतात. जर तुमचे मूल बाहेरचे भरपूर स्नॅक्स खात असेल तर घरी बटाट्याचे डोनट्स बनवा आणि त्यांना मस्त खायला द्या.

बटाटा डोनट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उकडलेले बटाटा - 4

बारिक चिरलेली हिरवी मिरची - 4/5

आलं -1 तुकडा

मीठ - चवीनुसार

कॉर्न फ्लोअर - 4 चमचे

तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

पीठ - 4 टिस्पून

ब्रेडचे तुकडे - अर्धा कप

बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून

तेल - तळण्यासाठी

कृती

  • सर्वात पहिले बटाटे सोलून उकळायला ठेवावे. बटाटे उकळल्यावर एका भांड्यात काढून किसून घ्यावे.

  • नंतर आलं, हिरवी मिरची पेस्ट , कॉर्न फ्लोअर आणि मीठ घालून मिक्स करावे. नंतर त्यात उरलेले सर्व साहित्य घालावे. 

  • आता या मिश्रणाचे गोळे बनवा आणि प्लॅस्टिकच्या कागदावर तेल लावून रोल तयार करा आणि चपटे करावे. नंतर कटरच्या मदतीने मध्यभागी गोल छिद्र करावे. 

  • तुमचे डोनट अगदी वडाच्या आकारात असेल. आता दुसर्‍या भांड्यात कॉर्न फ्लोअर आणि पिठात पाणी घालून पीठ तयार करावे.

  • आता कढईत तेल गरम करावे. नंतर डोनट कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात बुडवून ब्रेड क्रंबमध्ये गुंडाळून तेलात टाकावे. या दरम्यान मंद आचेवर ठेवा आणि सोनेरी होईपर्यंत तळावे.

  • तुमचे बटाट्याचे डोनट्स तयार आहेत. जे तुम्ही तुमच्या मुलांना चटणीसोबत सर्व्ह करू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT