Crispy Paneer Balls, Paneer Balls Recipe in Marathi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Recipe: चवदार आणि झटपट तयार होणारा पदार्थ 'Crispy Paneer Balls'

क्रिस्पी पनीर बॉल्स सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

दैनिक गोमन्तक

क्रिस्पी पनीर बोल्स हा पदार्थ केव्हाही तयार करून खाउ शकतो. दिवसभरात थोडीशी भूक लागली तर झटपट तयार करता येते, तर मुलांच्या पार्टीमधील हा हेल्दी स्नॅक्स आहे. पनीरमध्ये प्रथिने भरपूर असतात, त्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठीही (Health) त्याचा फायदा होतो. क्रिस्पी पनीर बॉल्स बनवायला अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी पनीर बोल्स कसे बनवायचे. (Crispy Paneer Balls Recipe in Marathi)

* साहित्य

पनीर बारीक किसलेला – 1/2 किलो
बारीक चिरलेला कांद – 1
रवा – 1/2 कप
मैदा – 4 टीस्पून
लाल मिरची पावडर – 1/2 टीस्पून
आमचूर – 1/2 टीस्पून
आले-लसूण पेस्ट – 1/2 टीस्पून
तेल
मीठ चवीनुसार घ्यावे.

* कृती

सर्वात पहिले पनीर बारीक किसून घ्यावे. एक बाउल यामध्ये पनीरमध्ये 4 चमचे सर्व पीठ घाला आणि चांगले मिक्स करावे. यानंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, आमचूर, आले-लसूण पेस्ट घालून एकजीव करावे. यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करून चांगले एकजीव करावे. या मिश्रणाचे हाताच्या मदतीने लहान गोळे तयार करावे. नंतर एका कढाईमध्ये हे पनीरचे गोळे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावे. तयार आहेत क्रिस्पी पनीर बॉल्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT