Paneer Samosa Recipe: सकाळच्या नाश्त्यात घ्या पनीर समोस्याचा आस्वाद

रोज पोहे, उपमा खाउन बोर झालात तर जाणून घ्या पनीर समोसा बनवण्याची रेसिपी
Paneer Samosa Recipe in Marathi
Paneer Samosa Recipe in Marathi Dainik Gomantak
Published on
Updated on

समोसा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही जर रोज पोहे, उपमा खाउन बोर झालात तर आम्ही तुम्हाला पनीर समोसाची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमा गरम पनीर समोस्याचा आस्वाद घेऊ शकता. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि झटपट होणार आहे. (Paneer Samosa Recipe in Marathi)

साहित्य

* बारीक चिरलेले पनीर

* बारीक चिरलेला कांदा

* 1/2 टीस्पून लाल तिखट

* 1/2 टीस्पून लिंबाचा रस

* 2 चिमूटभर मीठ

* 1 कप मैदा

* 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची

* 1/4 टीस्पून जिरे

* 25 ग्रॅम लोणी

* 1 कप सूर्यफूल तेल

Paneer Samosa Recipe in Marathi
Summer Cold Drink: Mango Mastani सह घ्या उन्हाळ्याचा आनंद

पनीर समोसा बनवण्याची पद्धत

1) एक बाऊलमध्ये मैदा, लोणी आणि मीठ चांगले मिक्स करावे. पीठ मळून झाल्यानंतर ओल्या सुती कापडाने झाकून ठेवावे .

2) नंतर एका कढईत थोडे तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. यामध्ये जिरे, कांदा, हिरवी मिरची घालून एक-दोन मिनिटे परतून घ्यावे. नंतर त्यात लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ आणि पनीर घालावे.

3) आता पिठाचे छोटे गोळे करा. त्यांना रोल करून चाकूच्या मदतीने ते अर्धे कापून घ्या. त्यात पनीरचे मिश्रण भरावे.

4) नंतर कढईत 1 कप तेल घ्यावे. समोसे मध्यम आचेवर तळून घ्यावे. सोनेरी तपकिरी झाल्यावर गॅस बंद करा आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये पनीर समोसे काढावे. पनीर समोस्याचा हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर घ्या आस्वाद.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com