Rashi Bhavishya 21 February 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rashi Bhavishya 21 February 2024: 'या' राशी लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता! वाचा तुमचे आजचे पूर्ण राशीभविष्य

Daily Horoscope 21 February 2024: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar

Rashi Bhavishya 21 February 2024 in Marathi

  • मेष

आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील - म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा.   (Daily Horoscope 21 February 2024)

  • वृषभ

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. (Rashi Bhavishya in Marathi) 

  • मिथुन

प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही यामुळे तुमचे नाते सुधारण्या ऐवजी बिघडू शकतात. तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. केवळ पैशाचा फायदा पाहू नका कारण नजिकच्या काळात तुम्हाला या बढतीचा उपयोग होईल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे.

  • कर्क

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. रोमान्ससाठी चांगला दिवस. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. 

  • सिंह

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे - त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. 

  • कन्या

आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. 

  • तुळ

कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराब ही होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.

  • वृश्चिक

भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल - तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्हीसुद्धा निराश व्हाल. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते. 

  • धनु

एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळ पैश्याची कमतरता होऊ शकते. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात.

  • मकर

या परमानंदाचा अनुभव घ्या. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाइल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.

  • कुंभ

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाºयांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. 

  • मीन

तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT