shubh muhurat for rakhi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला कधीपर्यंत राखी बांधता येईल? भद्रकाळ टाळा, नेमका शुभमुहूर्त जाणून घ्या

Raksha Bandhan Muhurat:या दिवशी भद्राकाळ सकाळीच समाप्त होतोय, त्यामुळे दिवसभर राखी बांधण्यासाठी पुरेसा शुभ मुहूर्त उपलब्ध असेल

Akshata Chhatre

Rakhi Muhurat 2025: भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा पवित्र सण यंदा ९ ऑगस्ट २०२५ म्हणजेच शनिवारी साजरा होणार आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला भद्राकाळाचे विशेष महत्त्व असते, कारण भद्राकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणींना काळजी करण्याची गरज नाही, कारण या दिवशी भद्राकाळ सकाळीच समाप्त होतोय, त्यामुळे दिवसभर राखी बांधण्यासाठी पुरेसा शुभ मुहूर्त उपलब्ध असेल.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्वाचे नियम

यंदा पौर्णिमा तिथी एक दिवस आधी, म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी दुपारी २:१२ वाजता सुरू होईल आणि ९ ऑगस्ट रोजी दुपारी १:२४ वाजता समाप्त होईल. त्यामुळे, रक्षाबंधनाचा मुख्य दिवस ९ ऑगस्ट असला तरी, राखी बांधण्यासाठी दुपारी १:२४ वाजेपर्यंतच वेळ असेल. यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल, ज्यात राखी बांधणे शुभ मानले जात नाही.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

रक्षाबंधन: शनिवार, ९ ऑगस्ट २०२५

पौर्णिमा तिथी प्रारंभ: ८ ऑगस्ट, दुपारी २:१२ वाजता

पौर्णिमा तिथी समाप्त: ९ ऑगस्ट, दुपारी १:२४ वाजता

भद्राकाल प्रारंभ: ८ ऑगस्ट, दुपारी २:१२ वाजता

भद्राकाल समाप्त: ९ ऑगस्ट, सकाळी १:५२ वाजता

राखी बांधण्याचा शुभ वेळ: सकाळी ५:३५ वाजल्यापासून ते दुपारी १:२४ वाजेपर्यंत

भद्राकाळात राखी का बांधू नये?

शास्त्र आणि मुहूर्तशास्त्रानुसार, भद्राकाळ हा अशुभ मानला जातो. त्यामुळे, या काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे. सुदैवाने, यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ पहाटेच संपत असल्यामुळे बहिणींना भावाला राखी बांधण्यासाठी सकाळी ५:३५ पासून ते दुपारी १:२४ वाजेपर्यंत पुरेसा वेळ मिळणार आहे. रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून, तो भाऊ-बहिणींमधील प्रेम, विश्वास आणि दृढ बंध दर्शवतो. या दिवशी विशेष पक्वान्न बनवले जातात आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

SCROLL FOR NEXT