Raksha Bandhan 2023: प्रत्येक भावाने आपल्या बहिणीसाठी कराव्या 'या' 5 गोष्टी

Raksha Bandhan 2023: तुम्ही तुमच्या बहिणीसाठी या 5 गोष्टी करून तिचा सपोर्ट सिस्टीम बनू शकता.
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Raksha Bandhan 2023: भावा-बहिणीचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावांच्या मनगटावर एक सुंदर राखी बांधते.

भाऊ त्या बदल्यात पैसे, भेटवस्तू, चॉकलेट आणि वचन देतो की तो तिला प्रत्येक संकटापासून वाचवेल. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवतो.

पण खरच एखादा भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तिथे असू शकतो का? नाही, पण तीला इतके सक्षम बनण्यास मदत करू शकतो की काहीही तिच्या दुःखाचे कारण बनू शकणार नाही.

तीला इतर कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी सपोर्ट सिस्टीम कसा असू शकतो हे जाणून घेऊ शकता.

  • प्रत्येक गोष्टीसाठी टोकू नका

बहिणीला प्रत्येक गोष्टीसाठी टोकू नका. उलट बाहेरचे जग समजून घेण्यास मदत करावी. तिच्या बोलण्याने तिला काही चुकीचे करण्यापासून रोखण्याऐवजी तीला आत्मविश्वास देते. ज्यामुळे बहीण स्वतः विचार करून गोष्टी करू लागते.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बहीण लोकांना समजत नाही, तर तिची मैत्रीण बनून तिला मदत करा. तीला मोकळेपणाने जगू द्या जेणेकरून ती स्वत: ला चांगले समजू शकेल.

Raksha Bandhan 2023
जेवताना पाणी पिणे टाळा अन् वाढत्या वजनाला घाला आळा
  • निर्णयावर विश्वास दाखवा

आजही अशी अनेक घरे आहेत. जिथे मुलींच्या निर्णयापेक्षा मुलांच्या निर्णयांना जास्त महत्त्व दिले जाते. असे केल्याने लहानपणापासूनच मुलींना योग्य-अयोग्य यातील फरक कळत नसल्याची जाणीव करून दिली जाते. 

मग ही गोष्ट त्यांना लग्नानंतर पती आणि मुलांवर अवलंबून राहण्यास भाग पाडते. अशावेळी प्रत्येक भावाने आपल्या घरात बहिणीला आपले मत मांडण्याची समान संधी मिळेल याची काळजी घ्यावी.

तसेच, त्याच्या निर्णयावर शंका घेण्याऐवजी किंवा त्याची खिल्ली उडवण्याऐवजी त्याच्यावर विश्वास ठेवावा जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल.त्यांना निर्णय घेण्याची संधी द्यावी.

  • स्वरंक्षणाचे प्रशिक्षण द्यावे

आजकालचे वातावरण पाहून बहिणीला स्वरंक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. कोण चांगले आणु कोण वाईट लोकांमध्ये फरक ओळखण्यास शिकवावे.

तिला शारीरिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी मदत करा जेणेकरुन तिला स्वतःला कोणाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी इतरांसमोर हात जोडावे लागणार नाहीत.

  • करिअर बनवण्यात मदत करावे

आजकालच्या काळात महिलांना आर्थिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. जर महिला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असेल तर एक आत्मविश्वास येतो.

बहिणीला चांगले करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. घरामध्ये लग्नाची चर्चा सुरू असेल तर आई-वडिलांना समजावून सांगावे. चांगले शिक्षण घेऊन करिअरवर भर देण्यास मदत करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com