natural ways to stop smoking Dainik Gomantak
लाइफस्टाइल

No Smoking Day 2025: स्ट्रोक, ह्रदयरोग, एजिंग वाढवणारे स्मोकिंग सोडण्यासाठी आयुर्वेदात आहे रामबाण उपाय, वाचा

How To Quit Smoking Using Ayurveda: नैसर्गिक उपचारांचा समावेश करून शरीरातील विषारी पदार्थांचे शुद्धीकरण करता येऊ शकते.

गोमंतक ऑनलाईन टीम

No Smoking Day 2025

धुम्रपान विविध आजारांना आमंत्रण देते. अलिकडे मोठ्या संख्येने तरुणवर्ग धुम्रपानाच्या व्यसनात अडकल्याचे दिसते. आरोग्यावर होणारे दुष्परिणामांची माहिती असताना किंवा नकळतपणे अनेकजण धुम्रपानाच्या आहारी जातायेत ही धक्कादायक बाब आहे. निकोटीनचे शरीरिरावर अनेक वाईट परिणाम होतात. पण, या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आयुर्वेदात देखील उपाय सांगण्यात आले आहेत.

आज जागतिक धुम्रपान प्रतिबंध दिवस (१२ मार्च) साजरा केला जात आहे. वाढत्या धुम्रपानाला प्रतिबंध आणि त्याचे दुष्परिणाम याची माहिती आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. तंबाखूचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात.

धूम्रपानाचे दुष्परिणाम

धूम्रपान केल्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतात, ते निरोगी गुलाबी पासून धोकादायक काळ्या रंगात रूपांतरित होते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका दुप्पट होतो, रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते.

धूम्रपान केल्याने वृद्धत्वाची प्रक्रियाही वेगवान होते. पण, निकोटिनच्या व्यसनावर मात करण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्यास पुनरुज्जीवित करण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

नैसर्गिक उपचारांचा समावेश करून शरीरातील विषारी पदार्थांचे शुद्धीकरण करता येऊ शकते आणि त्यांच्या श्वसन वाहिन्या मजबूत होऊ शकतात.

आयुर्वेदात काय उपाय सांगितलाय?

फुफ्फुस स्वच्छ करण्यासाठी तुळस आणि पिंपळी सारख्या औषधी वनस्पतींच्या डिटॉक्सिफाइंग गुणधर्मांचा वापर केला जाऊ शकतो, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

रोज सकाळी तुळशीची २-३ पाने चावून खाल्याने शरीरातील धूम्रपानाचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल. तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणामही हळूहळू कमी होतील.

तसेच, रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळाचे सेवन केल्यास निकोटीन टार शरीरातून बाहेर काढून टाकण्यास मदत होईल. त्रिफळा हे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसासाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक औषध मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

SCROLL FOR NEXT