puja vidhi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shravan Special: दिवसभरात तुम्ही पूजा कधी करतात? शास्त्रात वेळेला आहे विशेष महत्व, जाणून घ्या योग्य वेळ

हिंदू धर्मात देव-देवतांची नियमित पूजा करण्याला खुप महत्व आहे. पण पुजा करण्याची योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Shravan Special: हिंदू धर्मात देव-देवतांची नियमित पूजा करण्याला खुप महत्व आहे. मग ते घर असो किंवा मंदिरात नियमितपणे पुजा केली जाते. उपासनेने मनाला शांती तर मिळतेच, शिवाय जीवनात मंगलमयता येते आणि देवाची कृपा देखील राहते.

पण पूजेचे योग्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा कराल. चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी-देवता नाराज होतात आणि पूजा अपूर्ण मानली जाते. 

शास्त्रांमध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणूनच जाणून घेऊया पूजेसाठी योग्य वेळ कोणती आहे.

तुम्ही तुमच्या घरी नियमितपणे पूजा करा आणि सुख आणि समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा. पण देव तुमची पूजा तेव्हाच स्वीकारेल जेव्हा पूजा योग्य वेळी होईल. म्हणूनच हिंदू धर्मात उपासनेसाठी वेळा निश्चित केल्या आहेत.

यावेळी पूजा करणे चाळावे

  • शास्त्रानुसार दुपारी पूजा करू नये. हा काळ पूजेसाठी वर्ज्य मानला जातो. यावेळी केलेली पूजा देव स्वीकारत नाही. त्यामुळे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूजा करू नये. या वेळी पूजा केल्याने फळ मिळत नाही.

  • दुसरीकडे, जर तुम्ही आरती केली असेल, तर त्यानंतर पूजा करण्याची पद्धत करू नका. असे मानले जाते की पूजेच्या शेवटी आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपतात.

  • मासिक पाळी दरम्यान महिलांनी कधीही पूजा करू नये. या काळात देवळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरात पूजा करू नका. यासोबतच देवी-देवतांच्या मूर्ती, पवित्र वृक्ष, वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नयेत.

  • घरामध्ये सुतक आणि पाटाक बसवलेले असतानाही पूजा करू नका. म्हणजे नवजात बालकाचा जन्म झाला किंवा घरी कोणी मरण पावले. यावेळी पूजा करणे शुभ मानले जात नाही.

  • यासोबतच ग्रहण वगैरे काळात पूजा करू नये. परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्रांचा जप करू शकता.

  • पुजा करण्योयाची योग्य वेळ कोणती

ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात 5 वेळा पूजा करू शकता. यासाठी धर्मग्रंथात वेळही सांगितलेली आहे. या वेळेचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दिवसातून एकदा, दोनदा किंवा पाच वेळा पूजा करू शकता.

  • प्रथम पूजा- ब्रह्म मुहूर्त सकाळी 04.30 ते 5.00 पर्यंत

  • दुसरी पूजा - सकाळी 09 वाजेपर्यंत

  • मध्यान्ह पूजा - दुपारी १२ वाजेपर्यंत

  • संध्याकाळची पूजा - 04:30 ते 6:00 वा

  • शयन पूजा - रात्री ९.३० पर्यंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT