Protein Powder Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Protein Powder Benefits: मस्त फिटनेस हवाय? तर जाणून घ्या प्रोटीन पावडरचे फायदे

Protein Powder Benefits: शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोटीन पावडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

दैनिक गोमन्तक

Protein Powder Benefits: आजकाल शरीराच्या तंदुरुस्तीसाठी लोकं प्रोटीन पावडरचा सर्रास वापर करतात. प्रोटीन हे एक पॅावरफुल मॅक्रोन्युट्रिएंट आहे. जे हाडांना मजबुती देण्याचे काम करते. प्रोटीनमुळे शरीरामध्ये हर्मोन बॅलन्स आणि हर्मोन सर्क्युलेशन चांगले राहते. तुमच्या डोक्यावरील केस, तुमची त्वचा आणि अवयव हे शरीरातील काही भाग आहेत जे प्रोटीनमुळे चांगले राहतात. अनेक हेल्थ कॉन्शियस लोकांना पुरेसे प्रोटीन मिळण्याबाबत चिंता सतावत असते. शरीराला भरपूर प्रोटीन मिळण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे प्रोटीनयुक्त आहार घेणे. चला तर या प्रोटीन पावडरचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात..

Protein Powder

अनेक खळाडू आणि फिटनेस (Fitness) कोच शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, हाडांना मजबुती देण्यासाठी प्रोटीन पावडरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. परंतु प्रोटीन पावडर केवळ व्यायाम करणाऱ्या आणि खेळणाऱ्या लोकांसाठी नाही तर दैनंदिन प्रोटीनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पण अनेकजण याचा वापर करतात. तसेच वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पण प्रोटीन पावडर खातात. दुखापतीतून किंवा शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी पण अनेकजण प्रोटीन पावडरवर अवलंबून असतात.

Protein

तसेच,अनेक हाय प्रोटीन अन्नपदार्थ आपल्या शरीराच्या प्रोटीनच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करू शकतात. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर (USDA) नुसार, कोणत्या पदार्थांमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असते, हे सांगितले आहे. त्यानुसार,

चिकन: 24 ग्रॅम

1 कप काळा घेवडा: 15 ग्रॅम

1 कप मसूर: 16 ग्रॅम

1 कप वाटाणे: 15 ग्रॅम

½ कप दही: 12.5 ग्रॅम

1/2 कप बदाम: 16 ग्रॅम

Health

तर, प्रोटीन पावडर शरीराला लाभदायी आहे का? होय, जर प्रोटीन पावडर चांगल्या दर्जाची असेल. तसेच टेस्टींग केलेले उत्पादन असेल, ज्यामध्ये कमीत कमी साखर असेल आणि हानिकारक पदार्थ नसतील. अशा प्रोटीन (Protein) पावडरचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

SCROLL FOR NEXT