Goa Budget Trip| Goa| Tourism Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Budget Trip: गोव्यातील सुंदर बेटांना तुम्ही भेट दिलीयं?

Goa's Best Island: गोव्यातील बीच अन् नाइट पार्टी पाहून बोर झालात तर या सुंदर बेटांना नक्की भेट द्या.

दैनिक गोमन्तक

या उन्हाळ्यात घरी पाहुणे वगैरे आले असतील तर त्यांना आता गोव्यात नवीन ठिकाण कुठले दाखवावे हा प्रश्‍न तुम्हाला पडलेलाच असेल. देवळे, समुद्रकिनारे त्यांनी केव्हाच पाहिलेली आहेत आणि मुख्य म्हणजे गोव्यात राहणाऱ्यांनाच अनेकदा, गोव्यातल्या ठराविक गोष्टी सोडून अधिक काही माहिती नसते. आपल्या बजेटच्या मर्यादेत गोव्यात पाहता येतील अशा अनेक जागा आहेत. गरज असते ती फक्त उत्साहाची आणि नवीन काही ट्राय करून पाहू शकणाऱ्या आपल्या क्षमतेची. गोव्यात (Goa) असणाऱ्या सुंदर बेटांना भेट देण्याचा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? नसल्यास जरूर येऊ द्या आणि या विचाराला कृतीतही उतरवा. एका नवीन प्रकारच्या जागेला भेट देण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच लाभेल.

अर्थात चोडण किंवा दिवाडी ही बेटे सुंदर आहेत. पण फारशा ठाऊक नसलेल्या बेटांना भेट देण्यात अधिक आनंद आहे. तुम्ही जर दक्षिण गोव्यात रहात असाल तर पाळोले समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेल्या ‘कोणको’ या बेटाला भेट देऊन तिथे संपूर्ण दिवस व्यतीत करणे आनंदाचेच असेल. हे बेट ‘मंकी आयलंड’ (Monkey Island) म्हणूनही ओळखले जाते.

या बेटावरच्या जंगलात असणाऱ्या माकडांमुळे बेटाला हे नाव मिळाले आहे. या बेटावर जाण्यासाठी पाळोले इथून लहान बोटी आहेत. स्वत:चे जेवण घेऊन जात असाल तर या बेटावर एक दिवसाची तुमची आनंदाची सहल होऊ शकते. पाळोले किनाऱ्यावरूनच बोटीने जाता येणारे दुसरे बेट म्हणजे ‘बटरफ्लाय आयलंड’ (Butterfily Island) . आकाशातून हे बेट एखाद्या फुलपाखरांसारखे दिसते म्हणून ते ‘बटरफ्लाय आयलंड’. या अर्धवर्तुळाकृती बेटावर आपला दिवस अतिशय निवांतपणे जाईल आणि आपण जर नशीबवान असाल तर तिथल्या समुद्रात पोहणाऱ्या डॉल्फिन माशांशीही तुमची गाठ पडू शकेल. बेटांवर असताना तिथल्या समुद्रात पोहणे किंवा तिथून सूर्यास्‍ताचा आनंद घेणे हा अकल्पित अनुभव असेल.

तुम्ही उत्तर गोव्यात (Nort Goa) राहणारे असाल तर रायबंदर किंवा ओल्ड गोव्याच्या (Old Goa) समोर असणाऱ्या अनुक्रमे चोडण आणि दिवाडी बेटांवर, येताजाता कधीतरी नक्कीच पोहचला असाल. दिवाडीच्या ‘बोंदराच्या फेस्ता’चा आनंदही आपण घेतला असेल, पण वास्को (Vasco) शहरापासून सहा-सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंट जासिंतो बेटावर मात्र जाण्याचा योग आपल्याला क्वचितच आला असेल.

हे बेट मुख्य रस्त्याशी पुलाद्वारे जोडले गेले असल्याने तिथे जाण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. एखाद्या संध्याकाळी या बेटावर जाऊन तिथल्या पायवाटेने सबंध बेटाला तुम्ही फेरी घालू शकता. बेटाच्या पलीकडच्या बाजूला एक इवलासा किनाराही आहे. चालत चालत बेटावरच्या डोंगरमाथ्यावर गेलात तर तिथून दिसणारे आसपासचे दृश्‍य, सूर्यास्त नजरेत साठवून ठेवण्याजोगे नक्कीच आहे.

ज्यांना आपल्या माणसांसोबत निसर्गाच्या सानिध्यात रमण्याचा आनंद घ्यायचा आहे तर या बेटांवर नक्की भेट द्या. ‘नवीन जागा आणि नवीन आनंद’ असेच या भेटीचे सार असेल आणि पाण्याने घेरलेल्या या जागा आपल्याला थोडेसे अलिप्तचेही सुख देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT