Pitru Paksha Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pitru Paksha: पितृपक्षात चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका दान,अन्यथा पितृदोषापासून मिळणार नाही मुक्ती

पितृपक्षात कोणत्या गोष्टींचे दान करू नये हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Pitru Paksha: पितृ पक्षात वस्तु दान करण्याला खुप महत्व आहे. कारण पितृपक्षात दान करणाऱ्याला दुप्पट पुण्य मिळते असे मानले जाते. तसेच पुर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते. परंतु पितृपक्षाच्या काळात दान करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया पितृ पक्षात कोणत्या वस्तूंचे दान करू नये. कारण या वस्तूंचे दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. 

  • तेल

पितृ पक्षात तेल दान करणे अशुभ मानले जाते. पितृपक्षात तेल दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात, असा समज आहे. विशेषत: चुकूनही मोहरीचे तेल दान करू नका.

  • जुने कपडे

पितृपक्षात कपडे दान करायचे असेल तर फक्त नवीन कपडे दान करावे. तुमचे जुने आणि निरुपयोगी कपडे कोणालाही दान करू नका. तसेच बूट आणि चप्पल देखील दान करू नका. कारण असे दान केल्याने व्यक्तीवर राहू दोष आणि पितृदोषाचा प्रभाव पडतो. त्यामुळे तुमची प्रगती होत नाही.

  • उष्टे अन्न

पितृ पक्षात अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय शास्त्रात असेही सांगितले आहे की अन्नदान करणे हे श्रेष्ठ दान आहे. पितृपक्षात अन्नदान करायचे असेल तर चांगले अन्नदान करा आणि उष्ट अन्न कोणालाही देऊ नका. पितृपक्षात एखाद्याला चांगले आणि शुद्ध अन्न दिल्याने पूर्वज प्रसन्न होतात.

  • लोखंडी भांडे

पितृ पक्षाच्या काळात अनेकजण भांडी दान करतात, पण लक्षात ठेवा की लोखंडी भांडी दान करू नका. लोखंडाचे भांडे दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमच्यावर पितृदोषाचा आरोप होऊ शकतो. त्यामुळे फक्त स्टीलची भांडी दान करावी.

  • काळे कपडे

पितृ पक्षात व्यक्तीने काळ्या रंगाचे कपडे कोणालाही दान करू नयेत. पितृ पक्षामध्ये पांढर्‍या रंगाचे कपडे व्यक्तीला दान करावेत. पांढऱ्या रंगाचे कपडे दान केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT