Pitru Paksha 2023: पितृपक्षाला हिंदु धर्मात खुप महत्व आहे. पितृदोष कमी करण्यासाठी पितृपक्षात पितरांची मनोभावे पुजा केली जाते. १४ ऑक्टोबरला पितृपक्ष संपणार आहे. मनेभावे पुजा केल्यास पितर प्रसन्न होतात. तसेच काही गोष्टींची काळजी घेतल्यास जीवनात सुख-शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते. या काळात काही गोष्टींचे दान केल्यास शुभ मानले जाते. अशा गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
3)पुढिल गोष्टींचे करावे दान
1) काळे तिळे
श्राद्धाच्या वेळी काळ्या तिळाचे दान करावे. असे मानले जाते की जर तुम्ही पितृ पक्षात इतर काही दान करू शकत नसाल तर तुम्ही काळे तीळ अवश्य दान करावे.
2) गुळ
पितृपक्षात गुळाचे दान केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. घरात सुख-शांती नांदते. असे मानले जाते की गुळाचे दान केल्याने घरातील संकटेही दूर होतात.
3) अन्नदान
पितृपक्षात अन्नदान करणे हे श्रेष्ठ दान मानले जाते. असे मानले जाते की यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृ पक्षात अन्नदान करायचे असेल तर गहू आणि तांदूळ दान करणे शुभ मानले जाते.
4) चांदी
पितृपक्षा दरम्यान तुम्ही चांदीच्या वस्तूंचे दान करणे करू शकता. चांदीच्या वस्तु दान केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. यासोबतच त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतात.
5) मीठ
मीठामुळे जेवणाची चव वाढते. तसेच पितृपक्षात मीठ दान करण्याला खास महत्व आहे.मीठ दान न केल्यास पितरांची कृपा राहत नाही.
6) गाईचे तुप
आपल्या हिंदु धर्मात गाईला माता मानले गेले आहे. गायीची पूजा केल्याने सर्व अडथळे आपोआप संपतात. पितृपक्षात गाईच्या तुपाचे दान करणेही फलदायी मानले जाते.
पितृ पक्षात कोणती काळजी घ्यावी
पितृपक्षात दोन्ही वेळी स्नान करून पितरांचे स्मरण करावे.
तर्पणमध्ये काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे.
पितृपक्षात एकदाच सात्विक अन्न सेवन करावे. यामध्ये कांदा, लसूण, मांस आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे.
नेहमी दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पूर्वजांना तर्पण आणि पिंड दान अर्पण करावे.
कर्ज घेऊन किंवा दबावाखाली श्राद्ध करू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.