Pitru Paksha 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pitru Paksha: पितृपक्षातील शनिवारी पिंपळाच्या झाडाला 'या' वस्तु करा अर्पण, अनेक समस्या होतील दूर

पितृपक्षात शनिवारी काही खास उपाय केल्यास पितरांचा आर्शीवाद कायम तुमच्यावर राहिल.

Puja Bonkile

Pitru Paksha: हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो असे बोलले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवतांची एकत्र पूजा केल्याने फळ मिळते असे मानले जाते. 

पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. पितृपक्ष काही दिवसांनी संपणार आहे. पितृ पक्षामध्ये सांगितलेला कोणताही एक उपाय केल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न राहतील आणि तुम्हाला धनवान बनवतील.

दिवा लावावा

शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ कणकिचा दिवा लावावा. सर्वप्रथम कणकिचा दिवा लावावा आणि तेथे शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी आणि नंतर झाडावर चंदन किंवा कुंकु लावून ओम लिहावे.यामुळे पितर प्रसन्न होतात.

काळे तीळ दान करावे

शनिवारी काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. पितृ पक्षात देखील काळे तीळ शनिदेवांना मोहरीच्या तेल आणि काळे तिळ अर्पण केल्यास शनिदेव आणि तुमचे पूर्वज प्रसन्न होतात. यामुळे तुम्हालाही जर शनिदेव आणि पुर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय करावा.

गोड पदार्थ अर्पण करावे

पुर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. ५ वेगवेगळ्या पांढऱ्या मिठाई पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने पुर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात.

पाणी अर्पण करावे

पितृपक्षातील शनिवारी पाण्यात काळे तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. तसेच पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करून पिंपळाच्या झाडाला नमस्कार करावे.

कावळ्याला खायला द्यावे
शनिवारी कावळ्यांना खायला द्यावे. जर तुम्ही रोज कावळ्याला खाऊ घालू शकत नसाल तर शनिवारी नक्कीच कावळ्याला खाऊ घाला. असे केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT